Main Featured

IPL 2020- KKR Teamसाठी आनंदाची बातमी





शाहरुख खानचा मालकी हक्क असलेल्या त्रिनबागो नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघानं कॅरेबिनय प्रीमिअर लीगच्या ( CPL 2020) यंदाच्या पर्वाचे जेतेपद पटकावलं. कर्णधार किरॉन पोलार्डनं अंतिम सामन्यात डॅरेन सॅमीच्या सेंट ल्युसीआ झौक्स ( St Lucia Zouks) संघाच्या फलंदाजांना घाम फोडला. त्याच्या भेदक माऱ्यासमोर झौक्सच्या फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. त्यानंतर लेंडल सिमन्स आणि डॅरेन ब्राव्हो यांनी दमदार फलंदाजी करून रायडर्सला विजेतेपद मिळवून दिले. नाइट रायडर्सचे हे चौथे CPL जेतेपद आहे. याआधी त्यांनी 2015, 2017 व 2018 मध्ये जेतेपद पटकावले होते.

 KKR चौथे जेतेपद पटकावून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा खेळाडू Indian Premier League 2020 मध्येही दिसणार आहे. माजी विजेत्या कोलकाता नाइट रायडर्सनं ( Kolkata Knight Riders) नव्या खेळाडूंना करारबद्ध केले आहे. 140kphच्या वेगानं मारा करणारा हा अमेरिकन गोलंदाज यंदाचा मोसम गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. सोमवारी तो दुबईत दाखल झाला आणि KKRनं त्याचा व्हिडीओ पोस्ट केला. इंग्लंडचा गोलंदाज हॅरी गर्नी यानं माघार घेतल्यामुळे KKRनं त्याच्या जागी या वेगवान गोलंदाजाची निवड केली आहे. गर्नीनं खांद्यावरील शस्त्रक्रियेमुळे आयपीएलमधून माघार घेतली आणि मागील महिन्यात व्हिटॅलीटी ब्लास्ट स्पर्धेत त्याला दुखापत झाली होती. पॅट कमिन्ससह तोही प्रतिस्पर्धीं फलंदाजांचा त्रिफळा उडवण्यासाठी उत्सुक आहे.

कोण आहे हा गोलंदाज?

कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) अमेरिकेच्या 29 वर्षीय जलदगती गोलंदाज अली खान याला करारबद्ध केलं आहे.   अली खान हा IPL मध्ये खेळणारा पहिला अमेरिकन खेळाडू ठरणार आहे. CPL मध्ये सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये अली खानचा समावेश आहे. त्यामुळे त्याला जगभरातील ट्वेंटी-20 लीगमध्ये मागणी आहे. IPLच्या मागील मोसमात KKRनं त्याला स्टँडबाय खेळाडू म्हणून ठेवले होते. CPL 2020मध्ये त्यानं 8 सामन्यांत 9 विकेट्स घेतल्या आहेत.  2019मध्ये नामिबियाविरुद्धच्या सामन्यात त्यानं 49व्या षटकात तीन विकेट्स घेत अमेरिकेला विजय मिळवून दिला होता.







ड्वेन ब्राव्होनं त्याला CPLमध्ये आणले आणि त्यानं आतापर्यंत 12 सामन्यांत 16 विकेट्स घेतल्या आहेत. अली खानच्या समावेश झाल्यास KKRकडे आता इयॉन मॉर्गन, टॉम बँटन, आंद्रे रसेल, सुनील नरीन, ख्रिस ग्रीन, पॅट कमिन्स, ल्युकी फर्ग्युसन हे परदेशी खेळाडू असतील.

कोलकाता नाइट रायडर्स Kolkata Knight Riders Players List (KKR) - 

दिनेश कार्तिक, टॉम बँटन, शुबमन गिल, आंद्रें रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, ल्युकी फर्गुसन, नितीश राणा, प्रसिध कृष्णा, रिंकू सिंग, एस वॉरियर, शिवम मावी, सिद्देश लाड, सुनील नरीन, पॅट कमिन्स, इयॉन मॉर्गन, वरुण चक्रवर्थी, राहुल त्रिपाठी, ख्रिस ग्रीन, सिद्धार्थ, प्रविण तांबे, निखिल नाईक