Main Featured

IPL 2020 : CSK संघात रैनाच्या जागी ड्वाइड मलानला संधी??

IPL 2020- suresh raina

IPL 2020- आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होण्याआधीच चेन्नई सुपरकिंग्ज संघाला (CSK Team)धक्का बसला. संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने खासगी कारण देत संपूर्ण हंगामातून माघार घेतली. रैनाच्या परिवारातील सदस्याला पंजाबमध्ये झालेल्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले. 

अशावेळी आपल्या परिवारासोबत असणं अधिक गरजेचं असल्याचं वाटल्यामुळे रैना भारतात परतला. CSK ने अद्याप रैनाच्या ऐवजी संघात बदली खेळाडूला जागा दिलेली नाही. रैना यंदाच्या हंगामात पुनरागमन करेल अशीही चर्चा सुरु होती. परंतू आता CSK संघ व्यवस्थापन इंग्लंडच्या ड्वाइड मलानला रैनाच्या जागी संघात स्थान देण्याच्या विचारात आहे अशी काही प्रसारमाध्यमांमधून समोर येत आहे.

Must Read


कंगनाने शेअर केला बाळासाहेबांचा जुना VIDEO,म्हणाली......


राज्यात कोरोनाचं थैमान सुरूच, पुन्हा एकदा सर्वोच्च संख्याऑस्ट्रेलियाविरुद्ध (australia)पार पडलेल्या टी-२० मालिकेत मलानने इंग्लंडकडून चांगला खेळ केला. CSK चं संघ व्यवस्थापन मलानच्या खेळामुळे प्रभावित झालंय. “सध्या फक्त चर्चा सुरु आहे. कोणतीही गोष्ट अंतिम झालेली नाही. मलान हा चांगला टी-२० खेळाडू आहे. रैनाप्रमाणे तो देखील डावखुरा फलंदाज आहे. परंतू आम्ही रैनाच्या बदल्यात कोणाला संधी द्यायची की नाही यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही.” सूत्रांनी Inside Sport ला माहिती दिली.


परंतू चेन्नई सुपरकिंग्जचे CEO काशी विश्वनाथन यांनी मलानला रैनाच्या जागी संधी देण्याबाबतचं वृत्त फेटाळलं आहे. विश्वनाथन यांनी CSK संघाचा परदेशी खेळाडूंचा कोटा पूर्ण झालेला असल्यामुळे कोणत्याही नवीन खेळाडूला संधी देणार नसल्याचं स्पष्ट केलं. चेन्नईच्या संघात सध्या लुन्गिसानी एन्गिडी, इम्रान ताहीर, जोश हेजलवूड, मिचेल सँटनर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु-प्लेसिस, सॅम करन हे परदेशी खेळाडू आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका पार पडल्यानंतर ड्वाइड मलानने आयसीसी टी-२० क्रमवारीत बाबर आझमला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला. ३ सामन्यांत मलानने १२९ धावा पटकावल्या. ज्यात पहिल्या सामन्यातील ६६ धावांच्या खेळीचाही समावेश आहे. बिग बॅश लिग स्पर्धेतील संघही मलानला करारबद्ध करण्यासाठी उत्सुक आहेत. परंतू मलानने याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही.