Main Featured

IPL 2020: मुंबई इंडियन्सकडून खेळणार अर्जून तेंडुलकर?

Mumbai Indians


आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामाला 4 दिवसांनी सुरुवात होत आहे. 19 सप्टेंबर रोजी पहिलाच सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Superkings) यांच्यात होणार आहे. चारवेळा आयपीएल चॅम्पियन असणाऱ्या रोहित शर्माचा संग पाचव्यांदा आयपीएल जिंकण्यास सज्ज आहे. 


यासाठी खेळाडूंनी कसून सरावाला सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यातच संपूर्ण संघ युएइमध्ये दाखल झाला. मात्र मुंबई संघाच्या एका फोटोमुळे चाहते संभ्रमात आहे. या फोटोमध्ये मुंबईच्या खेळाडूंसोबत पूलमध्ये सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जून तेंडुलकर (Arjun Tendulkar) दिसला. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अर्जून मुंबईकडून खेळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

या फोटोनंतर अर्जून मुंबई संघात (Mumbai Indians)  सामिल झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र अर्जून संघात नाही तर नेट बॉलर म्हणून संघात सामिल झाला आहे. कारण नियमांनुसार, कोणताही संघ नवीन खेळाडू संघात सामिल करू शकत नाही, जोपर्यंत खेळाडू संघाबाहेर होत नाही. त्यामुळ अर्जूनला नेट बॉलर म्हणून संघात घेतले आहेत. अर्जून मुंबईच्या फलंदाजांना गोलंदाजी करताना दिसेल.


टीम इंडियासाठीही अर्जून करायचा नेट बॉलिंग

याआधीही अर्जून मुंबई संघाच्या नेट सेशनमध्ये दिसला होता. 20 वर्षीय अर्जूननं याआधी भारतीय संघासाठीही नेटमध्ये बॉलिंग केली आहे. इंग्लंड दौऱ्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज गोलंदाजांना अर्जून गोलंदाजी करायचा. तर, 2017 महिला वर्ल्ड कप फायनलमध्येही नेटमध्ये गोलंदाजी करताना अर्जून दिसला होता. अर्जून एक ऑलराउंडर खेळाडू असून रणजीमध्ये तो मुंबई संघाकडून खेळतो.