Main Featured

दर महिन्याला 1000 रुपयांच्या बचतीतून कमवा लाखो रुपये

investment

सध्या कोरोनाच्या (corona)संकटकाळात बचतीबरोबरच गुंतवणूक (investment) करणे आवश्यक आहे. मात्र कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना तुमचे उत्पन्न किती आहे, कशासाठी गुंतवणूक करत आहात, किती गुंतवणूक करायची आहे आणि कुठे या गोष्टींचे आकलन करणे गरजेचे आहे. 

गुंतवणुकीतून केवळ पैशांची बचत करण्याचे ध्येय नसते तर ती वाढवायची देखील असते. अशावेळी गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे खूप जास्त पैसे हवेत असेही गरजेचे नाही. महिन्याला 500 किंवा 1000 रुपये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता. जाणून घ्या असे 5 पर्याय जिथे तुम्ही दर महिन्याला 1000 रुपये गुंतवणूक चांगला फायदा मिळवू शकाल.

1. कंपन्यांच्या शेअर्समध्ये investment

शेअर बाजारातील विविध कंपन्यांमध्ये 1000 रुपये गुंतवणूक करून तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ चांगला बनवू शकता. एवढ्या कमी रकमेमध्ये तुम्ही मोठ्या कंपन्यांच्या स्टॉकमध्ये नाही गुंतवणूक करू शकत मात्र काही छोट्या कंपन्या आहेत, ज्यांची चांगली वाढ होत आहे आणि त्यांचे शेअर्स हजार रुपयांपेक्षाही कमी आहेत.
हे शेअर्स खरेदी करून तुम्ही फायदा मिळवू शकता. मात्र कोणताही शेअर खरेदी करण्याआधी रिसर्च अवश्य करा आणि या उद्देशाने खरेदी करा की तो शेअर 7 ते 10 वर्षांनी विकायचा आहे. फंडामेंटली स्ट्राँग असणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा

2. म्युच्यूअल फंड 

तुम्ही म्युच्यूअल फंडमध्ये  (Mutual Fund) दरमहा 500 रुपयांची देखील गुंतवणूक करू शकता. म्युच्यूअल फंड कंपन्या गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन ते कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवतात. ज्यांना शेअर बाजाराबाबत फार माहिती नसेल, त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. गुंतवणूकदार त्यांच्या आर्थिक लक्ष्याप्रमाणे  Mutual Fund स्कीम निवडतात.  Mutual Fund च्या कोणत्याही डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कमिशन द्यावे लागत नाही.
दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये त्यामुळे रिटर्न देखील वाढतो. एसआयपीच्या (SIP) माध्यमातून तुम्ही यात गुंतवणूक करू शकता. तुम्ही इक्विटी म्युच्यूअल फंड (Equity Mutual Fund), डेट म्युच्यूअल फंड (Debt Mutual Fund) किंवा हाइब्रिड म्युच्यूअल फंड स्कीम (Hybrid Mutual Fund)मध्ये गुंतवणूक करू शकता.

3. पब्लिक प्रोव्हिडंट फंड

पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) मध्ये गुंतवणूक करणे सर्वात कमी जोखमीचे आहे. यामध्ये पैसे बुडण्याची भीती नाही आहे. आता पीपीएफवर वार्षिक 7.1 टक्के व्याज मिळते आहे आणि सरकारकडून इनकम टॅक्स कलम 80 सी अंतर्गत पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्यावर 1.5 लाखापर्यंतचे टॅक्स बेनिफिट देखील देते. याचा लॉक पीरिएड 15 वर्षांचा असतो. पंधरा वर्षापर्यंत जर तुम्ही पीपीएफमध्ये दरमहा 1000 रुपये जमा केले तर एकूण रक्कम 1,80,000 रुपये होते, मात्र तुम्हाला मिळणारी रक्कम 3,25457 रुपये आहे. याशिवाय टॅक्स बेनिफिट मिळतात.

4. रेकरिंग टर्म डिपॉझिट

रेकरिंग डिपॉझिट (RD) एक प्रकारचे टर्म डिपॉझिट आहे. आरडीमध्ये तुम्ही दरमहिन्याला कमीतकमी 100 रुपयांची गुंतवणूक करू शकता. याचा सर्वात जास्त मॅच्यूरिटी पीरिएड 10 वर्षांचा आहे.
यामध्ये ग्राहकांना 3% ते  9% व्याजदर मिळतो. एफडीमध्ये तुम्हाला एकदाच पैसे गुंतवावे लागतात, तर आरडीमध्ये SIP प्रमाणे मासिक पद्धतीने गुंतवणूक करू शकता.

5. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) एक छोटी बचत योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही 100 रुपयापासून कितीही रकमेची गुंतवणूक करू शकता. सध्या यावर 6.8 टक्के दराने व्याज मिळते आहे. पोस्ट ऑफिस किंवा बँकेत याची खरेदी करता येते. यामधील गुंतवणुकीवर इनकम टॅक्स कायदा कलम 80 सी अंतर्गत वार्षिक 1.5 लाख रुपयाचे टॅक्स बेनिफिट मिळते. जर तुम्ही 5 वर्षासाठी NSC मध्ये दरमहा 1000 रुपये जमा केले तर पहिल्या वर्षात 12000 रुपये जमा होतील, मात्र 5 वर्षानंतर हीच रक्कम 16,674 रुपये झाली असेल.