Main Featured

देशातील करोनाबाधितांची संख्या ५१ लाखांच्या पारIndia corona case- गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. मागील चोवीस तासांत देशात ९७ हजार ८९४ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दिवसभरात तब्बल १ हजार १३२ जणांना करोनामुळे (corona) मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, यानंतर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ५१ लाखांच्या पार गेली आहे.


Must Read

मागील चोवीस तासांमध्ये देशात ९७ हजार ८९४ नव्या करोनाबाधितांची नोंद (India corona case) झाली असून १ हजार १३२ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ५१ लाख १८ हजार २५४ इतकी झाली आहे. तर देशात सध्या १० लाख ९ हजार ९७६ अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत ४० लाख २५ हजार ०८० जणांनी करोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत ८३ हजार १९८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.
सध्या देशात करोनाच्या चाचण्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. बुधवारी देशात तब्बल ११ लाख ३६ हजार ६१३ जणांची करोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत देशात ६ कोटी ५ लाख ६५ हजार ७२८ जणांची करोना चाचणी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली.