Main Featured

करोनाबाधितांच्या संख्येत उच्चांकी नोंद

india corona cases

India- देशात सध्या करोनाचा (corona)प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात सतत करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात नोंद होत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात करोनाबाधितांच्या संख्येत (India corona cases)उच्चांकी ९७ हजार ५७० नव्या रूग्णांची नोंद झाली. तर देशात १ हजा २०१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यविभागाकडून देण्यात आली. यानंतर देशातील करोनाबाधितांच्या संख्येनं ४६ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.


Must Read

गेल्या चोवीस तासांत देशात ९७ हजार ५७० नव्या रुग्णांची नोंद झाली असून १ हजार २०१ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ४६ लाख ५९ हजार ९८५ वर पोहोचली आहे. देशात सध्या ९ लाख ५८ हजार ३१६ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर दुसरीकडे आतापर्यंत ३६ लाख २४ हजार १९७ रूग्णांनी उपचारानंतर करोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत ७७ हजार ४७२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
देशात  (India corona cases)टाळेबंदी लागू असलेल्या मे महिन्यात ६४ लाख नागरिकांना, म्हणजेच देशातील बिगरअल्पवयीन ०.७३ टक्के लोकांना करोनाची लागण झाली होती, असा निष्कर्ष भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या (आयसीएमआर) पहिल्या देशव्यापी सीरो सर्वेक्षणाच्या अहवालात नोंदविण्यात आला आहे.
हे सर्वेक्षण ११ मे ते ४ जून या काळात करण्यात आले. त्या अंतर्गत २१ राज्यांतील २८ हजार जणांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. एकूण ६४ लाख ६८ हजार ३८८ नागरिक करोनाबाधित झाले होते. हे सर्वेक्षण ग्रामीण भागांमध्ये अधिक केले गेल्यामुळे या भागांमध्ये संसर्गाचे प्रमाण तुलनेत अधिक असल्याचे नोंदले गेले आहे. 
बाधितांचे प्रमाण ग्रामीण भागांमध्ये ६९.४ टक्के, शहरी झोपडपट्टय़ांमध्ये १५.९ टक्के, शहरी उर्वरित भागांत १४.६ टक्के असे होते. वयोमानाप्रमाणे १८ ते ४५ वयोगटात हे प्रमाण ४३.३ टक्के, ४६-६० वर्षे वयोगटात ३९.५ टक्के, तर ६० वर्षांवरील वयोगटात १७.२ टक्के होते. 
सर्वेक्षणातील अनुमानानुसार, आरटीपीसीआर चाचणीतून एक बाधित व्यक्ती सापडली तर ८२ ते १३० बाधित असलेल्या पण न सापडलेल्या व्यक्ती होत्या. करोनाची बाधा एक टक्क्यापेक्षा कमी लोकांना झाल्याचे आढळले आहे. म्हणजेच देशातील प्रचंड लोकसंख्येला करोनाची बाधा होण्याचा धोका असू शकतो.