Main Featured

गेल्या 24 तासातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 98 हजाराच्या जवळ देशातील कोरोना (how did corona virus start) ग्रस्तांचा आकडा गेल्या 24 तासात मोठ्या आकड्याने वाढला आहे. बुधवारी देशभरात 98,894 कोरोनाग्रस्त वाढले असून 1132 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारच्या वाढीनंतर देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 51 लाखाच्या पार गेला आहे.

Must Read

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशात 51,18,254 कोरोनाग्रस्त असून त्यात 10,09,976 अॅक्टिव्ह कोरोनाग्रस्त आहेतक. तर एकूण 40,25,080 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशातील मृतांचा आकडा 83,198 झाला आहे. देशात गेल्या 24 तासात 11 लाख चाचण्या झाल्या असून एकूण चाचण्यांचा आकडा 6 कोटीच्या पुढे गेला आहे.