Main Featured

सलग पाचव्या दिवशी कोरोनाचा कहर सुरूच

India corona casesIndia corona cases- सलग पाचव्या दिवशी आज 90 हजारहून नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या एकूण कोरोनाबाधितांची (corona) संख्या 48 लाख पार झाली आहे. गेल्या 24 तासांत 92 हजार 071 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. गेल्या पाच दिवसातील हा कमी आकडा आहे. तर, एकाच दिवसात 1136 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह एकूण मृतांचा आकडा 79 हजार 722 झाला आहे. आतापर्यंत 37 लाख 80 हजार 108 लोक निरोगी झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात 9 लाख 86 हजार 598 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात 74% अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुख्य म्हणजे हे सर्व रुग्ण देशातील 9 राज्यांमध्ये (India corona cases)आहेत. सर्वात जास्त रुग्ण 28% महाराष्ट्रातील आहेत. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे, तिथं 11% रुग्ण आहेत. तिसऱ्या स्थानावर आंध्र प्रदेश 10% अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशात 7%, तामिळनाडुत 5%, ओडिशात 4%, तेलंगणा, आसाम, आणि छत्तीसगढमध्ये 3-3% अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. बाकी 26% रुग्ण हे इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

Must Read


मृत्यूदरात घट, रिकव्हरी रेट वाढला

दिलासादायक बाब म्हणजे मृत्यूदरात सलग घट होत आहे. तर, रिकव्हरी रेट वाढत आहे. मृत्यूदर सध्या 1.64% आहे. तर, अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही घट झाला आहे. सध्या 21% अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रिकव्हरी रेट 78% आहे. ICMRनुसार 13 सप्टेंबरपर्यंत कोरोनाचे एकूण 5 कोटी 72 लाख सॅंपल टेस्ट केले गेले होते. यांपैकी 10 लाख सॅंपलची टेस्टिंग रविवारी करण्यात आली.