Main Featured

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल


                                     crime

इचलकरंजी येथे नवीन घर बांधण्यासाठी माहेरून 5 लाख रुपये न आणल्याने विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पतीसह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अश्‍विनी अदिक टकले (वय 30, रा. इंदिरा कॉलनी) असे आत्महत्या केलेल्या विवाहीतेचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेचे वडील सुरेश उत्तम लोटके (वय 56, रा. जवाहरनगर, इचल.) यांनी फिर्याद दिली आहे.

Must Read


सुरेश लोटके यांची मुलगी अश्‍विनी हिचा 10 वर्षांपूर्वी अदिक टकले याच्याशी विवाह झाला होता. त्यांना 14 महिन्यांचा मुलगाही आहे. (Filed a case of incitement to suicide)सासरचे लोक नवीन घर बांधण्यासाठी माहेरून 5 लाख रुपये आणावेत म्हणून अश्‍विनी हिच्याकडे तगादा लावत असल्याने 2 लाख रुपये दिले होते. तरीही उर्वरीत 3 लाख रुपये आणावेत म्हणून सासरचे लोक अश्‍विनी हिचा शारीरीक, मानसिक छळ करून जाचहाट करत होते. त्याला कंटाळून अश्‍विनीने 13 सप्टेंबर रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. 

अश्‍विनीला तिच्या पतीने खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यामुळे सुरेश लोटके यांनी अश्‍विनीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अदिक महादेव टकले (वय 38), सुलोचना महादेव टकले, महादेव भानुदास टकले ( वय 70, सर्व रा. इंदिरा कॉलनी) या सासरच्या तिघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.