Main Featured

मद्यधुंद निवृत्त पोलीस निरीक्षकाने सहा जणांना उडवले, एकाचा मृत्यूपुण्यातील बालेवाडी भागातील ममता चौकात निवृत्त पोलिस निरीक्षकाने 
police inspector दारू पिऊन कार चालवत असताना. सहा जणांना उडवले असून, त्यातील एका नागरिकाचा या घटनेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.संतोष बन्सी राठोड (वय ३५) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, निवृत्त पोलीस निरीक्षक संजय वामनराव निकम (वय ५९) या आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी येथील ममता चौकात असलेल्या पंक्चरच्या दुकानाजवळ दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास संतोष बन्सी राठोड, सलमान तांबोळी, छोटू पंक्चरवाला, राजेश सिंग, आनंद भांडवलकर, दशरथ माने हे थांबले होते. त्यावेळी निवृत्त पोलीस निरीक्षक संजय वामनराव निकम हे दारूच्या नशेत कार घेऊन निघाले  होते. दरम्यान, पंक्चरच्या दुकानाच्या जवळ असलेल्या गाड्यांना आणि नागरिकांना त्यांच्या वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना घडली.

या घटनेत संतोष राठोड यांचा मृत्यू झाला असून इतर पाच जण जखमी झाले आहेत. यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या सर्वांवर उपचार सुरू आहेत. तसेच या घटनेतील संबधित आरोपी संजय निकम यांना ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरू असल्याचे चतुःशृंगी पोलिसानी माहिती दिली.