Main Featured

IPL 2020 मध्ये विराट, धोनी फेल

virat kohali and ms dhoniIPL 2020- आयपीएलचा तेरावा हंगाम सुरू होऊन एका आठवडा झाला आहे. सर्व संघाचे दोन-तीन सामने झाले आहे. मात्र अद्यापही मोठ्या, अनुभवी खेळाडूंना चांगली खेळी करता आलेली नाही आहे. तर, युवा खेळाडू (cricket player)प्रत्येक सामन्यात संघाचा भार उचलत आहेत. याचे श्रेय जाते भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडला.

संजू सॅमसन आणि इशान किशान इंडिया एमध्ये होते. तर पृथ्वी शॉ, शूभमन गील सारखे खेळाड़ू अंडर-19मध्ये द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळले. या आयपीएलमध्ये (IPL 2020) पहिल्या सामन्यापासूनच या सर्व युवा खेळाडूंचा बोलबाला आहे.

Must Read

1) रेशन कार्डला करा आधार लिंक, अन्यथा मोफत धान्य बंद
2) SBI-ICICI सह आज रात्रीपासून बंद होणार ही महत्त्वाची सेवा

3) रिया चक्रवर्तीने जाणिवपूर्वक केलं हे काम, एनसीबीचा मोठा खुलासा

4) दोन्ही राजांनी आरक्षणाचा प्रश्न भाजपकडून सोडवावा
5) टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो

राजस्थान रॉयल्सचा संजू सॅमसन या हंगामात जबरदस्त फलंदाजी करत आहे. दोन सामन्यात सॅमसननं 214.86 च्या स्ट्राइक रेटनं 159 धावा केल्या आहेत. संजू गेल्या वर्षी भारतीय संघात येण्याआधी द्रविडच्या मार्गदर्शनाखाली इंडिया एमध्ये होता

बंगळुरू संघाचा युवा फलंदाज (cricket playerदेवदत्त पडीक्कल याचे नाव प्रत्येकाच्या तोंडी आहे. उत्तम सलामीवीर म्हणून देवदत्तची ओळख झाली आहे. त्यानं 3 सामन्यात 111 धावा केल्या आहेत. देवदत्तही द्रविडच्या मार्गदर्शनाखाली अंडर-19 संघात होता.

कोलकाताचा स्टार खेळाडू शुभमन गिल एक जबरदस्त फलंदाज म्हणून आयपीएलमध्ये दिसत आहे. गिलनं 105.75च्या स्ट्राइक रेटनं 77 धावा केल्या. कोलकाता संघाला गिलकडून खूप अपेक्षा आहेत.

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर युवा फलंदाज पृथ्वी शॉ एक चांगला फलंदाज आहे. शॉनं 132.69च्या स्ट्राइक रेटनं 69 धावा केल्या आहेत.

मुंबई विरुद्ध बंगळुरू संघात झालेल्या सामन्यात हिरो ठरला तो इशान किशाननं. इशाननं मुंबईकडे 58 चेंडूत 99 धावांची तुफानी खेळी केली. यात 11 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.