Main Featured

IGM रुग्णालयाला आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांच्या भेटीने चर्चेला उधान


                               

इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाला आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी भेट दिली. रुग्णालयात उभारलेल्या ऑक्सिजन टँकची पाहणी करून मिळवणार्‍या सोयी सुविधांबद्दल रुग्णांशी संवाद साधला. तसेच वैद्यकिय अधिकार्‍यांना सुचना केल्या. तर आयजीएम रुग्णालयाच्या सक्षमीकरणासाठी आम्ही किंवा शासनाने जबाबदारी झटकली नसल्याचा अप्रत्यक्ष टोला मंत्री पाटील यांनी आमदार आवाडे यांना लगावला.  

दोन दिवसांपूर्वी आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार बैठक घेऊन आयजीएममधील अपुर्‍या सोयी सुविधांबद्दल तिन्ही मंत्र्यांचे दुर्लक्ष असल्याची जाहीर टिका केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर आज आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांच्या भेटीने चर्चेला उधान आले होते. मंत्री यड्रावकर यांनी रुग्णालयात विविध ठिकाणी भेटी देऊन रुग्णांशी संवाद साधला. शासनाकडून देण्यात येणार्‍या सोयी सुविधां याबाबत माहिती घेतली. त्याचबरोबर नव्याने उभारलेल्या 6 हजार लिटर क्षमतेच्या ऑक्सिजन टँकची पाहणी करून लवकरच याद्वारे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करणार असल्याचे सांगितले. 

रुग्णालयातील 42 कर्मचार्‍यांच्या समावेशनाबाबत बोलताना त्यांनी समावेशनातील त्रुटी दुर करून त्यांना सेवेत रुजु करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एचआरटीसी तपासणी दराबाबत शासन पातळीवर लवकरच नियंत्रण आणण्याचे पत्रक जारी करण्यात येईल. ज्यावेळी कोविडचा प्रार्दुभाव चालु झाला त्यावेळी खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद करून रुग्णांची फरफट करत शासकीय यंत्रणेवर भार टाकला. 

हेही वाचा 

1) इचलकरंजीत "या' संघटना आक्रमक, केली जोरदार निदर्शने

2) कोल्हापूरकरांची चिंता वाढली

3) काय आहे कोल्हापुराच्या जनता कर्फ्युची परिस्थिती

4) कोल्हापूरात तरुणाचा निर्घृण खून

5) सांगलीत जनता कर्फ्यूचा उडाला बोजवारा

 आता पॅकेजच्या नावाखाली रुग्णांनी हॉस्पिटलमधील बेड उपलब्ध करून देण्यासाठी हेच खाजगी डॉक्टर कोविड सेंटरच्या मागणीसाठी शासनाकडे प्रयत्न करत आहेत. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर आयजीएम रुग्णालय सक्षमीकरणाला गती आली. कोविड साथीच्या काळात सरकार राज्यातील आरोग्य सेवेसाठी प्रामाणिकपणे लढा देत आहे. त्याबद्दल शंका व्यक्त करण्याचे कोणतेच कारण नाही.

अधिष्ठाता डॉ. आर.आर. शेट्टे यांच्याकडून माहिती घेत रुग्णांवर योग्य उपचार करावेत तसेच आवश्यक त्या सर्वसाधन सामग्रीसाठी पाठपुरावा करण्याच्या सुचना केल्या. नगरसेवक मदन कारंडे, शशांक बावचकर, राहुल खंजिरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख महादेव गौड, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे, शिवसेना शहर प्रमुख सयाजी चव्हाण, उदयसिंग पाटील उपस्थित होते.