इचलकरंजी येथे हॉटेल, रेस्टॉरंट, धाबे आणि स्टॉलंना पार्सल सुविधेची परवानगी आहे. मात्र त्या ठिकाणी सर्रास जेवणावळी सुरू असल्यानं जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार पोलीस उपअधिक्षकांच्या पथकानं इचलकरंजीतील 8 हॉटेल, धाबे, रेस्टॉरंटवर कारवाई केली. ही कारवाई पुढंही सुरू राहणार असल्याचं पोलीस उपअधिक्षक गणेश बिरादार यांनी सांगितलं.

कोरोना संसगर्र् रोखण्यासाठी हॉटेल, रेस्टॉरंट, धाबे यासह गर्दीची ठिकाणं बंद होती. मात्र अनलॉक सुरू झाल्यावर हळुहळु सर्व व्यवहार सुरू आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी हॉटेल, रेस्टॉरंट, धाबे यांनाही पार्सल सुविधा सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र त्या ठिकाणी जेवणावळी झडत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार पोलीस उपअधिक्षक गणेश बिरादार यांच्या पथकानं इचलकरंजीतील हॉटेल आस्वाद, जमजम, पिरजादे, राजनंदीनी, कम चिअर्स, ताज, नाजुकानंद, शिवदास मासांहारी खानावळ अशा 8 चालकांवर कारवाई केली. याचप्रमाणं हुपरी आणि कुरूंदवाड इथल्या प्रत्येकी 2 हॉॅटेलवर कारवाई केली असून भविष्यात ही मोहिम सुरूच राहणार असल्याचंं उपअधिक्षक बिरादार यांनी सांगितलं.

हे वाचून तर बघा....