Main Featured

जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहीतेचा विनयभंग


                                 kill husband

इचलकरंजी येथे  प्रेमसंबंध ठेवण्यासाठी पती व मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहीतेचा विनयभंग (Debauchery) केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. राहुल शिंगारे (रा. कबनुर हायस्कुलजवळ) असे त्याचे नाव आहे. याबाबतची फिर्यादी पिडीत महिलेने दिली आहे. पिडीत महिलेचे शहरात खाद्य पदार्थ विक्रीचे दुकान आहे. या दुकानात येऊन राहुल शिंगारे याने दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास प्रेमसंबंध ठेवले नाही तर पती व मुलांना जीवंत ठार मारणार, तुझी बदनामी करणार अशी धमकी दिली तसेच दुकानातील साहित्याची नासधुस केली व विवाहितेच्या अंगाशी झटापट करून तिचा विनयभंग केला व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याबाबत पिडीत महिलेच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यता येत आहे.

हे वाचून तर बघा....