Main Featured

मटका जुगार अड्ड्यावर धाड : 46 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त


                                   matka

इचलकरंजी येथे इचलकरंजी इथं मटका जुगार अड्ड्यावर धाड टाकून गावभाग पोलिसांनी चौघांना अटक केली. संपत विष्णुपंत नवनाळे (वय 63, रा वेताळपेठ), रोहित दिनकर पाटील (वय 25, रा. संभाजीनगर इचल.), बबन ज्ञानदेव चव्हाण (वय 58, रा. रिक्रेशन हॉल) आणि विजय आनंदराव जाधव (वय 33, रा. लोहार गल्ली, गावभाग) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून रोख रक्कम, 6 मोबाईल, मटक्याचे साहित्य असा 46 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हे वाचून तर बघा....


इचलकरंजीतील रिक्रेशन हॉलच्या बाजुस मंगळवार पेठेत बबन चव्हाण यांच्या मालकीच्या खोलीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली. त्यानुसार सदर ठिकाणी छापा टाकला असता संपत नवनाळे, रोहित पाटील, बबन चव्हाण आणि विजय जाधव हे कल्याण मटक्याचे लोडींग घेवुन बेकायदेशीररीत्या मटका जुगाराचे ऑफिस चालवत असताना मिळून आले. त्यांच्याकडून रोख रक्म, 6 मोबाईल, जुगाराचं साहित्य असा 46 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पो.कॉ. शशिकांत ढोणे यांच्या फिर्यादीनुसार मटका जुगाराचे ऑफिस चालवणे आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याप्रकरणी चौघाच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अधिक तपास पो.हे.कॉ. वाघमारे हे करत आहेत.