Main Featured

आयजीएम रुग्णालय सुसज्ज करण्यासाठी लक्ष देणं गरजेचं


                                   igm ichalkaranji

इचलकरंजी येथे कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांनी आयजीएम रुग्णालय सुसज्ज करण्यासाठी लक्ष देणं गरजेचं होतं. मात्र त्यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी केला. 70 बेडच्या अतिदक्षता विभागासह 300 बेडचं आयजीएम रुग्णालय सक्षमकरण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

इचलकरंजी शहर आणि परिसरात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. त्यामुळं शहर कोरोना मुक्त करण्यासाठी आयजीएम रुग्णालयाला आमदार फंडातून रुग्णवाहिका मंजुर केली आहे. सध्या 20 बेडचा अतिदक्षता विभाग सुरू असून 6 व्हेटिलेटरची सोय आहे. 64 सिसीटीव्ही बसवले असून आजपासून 4 व्हेटिलेटर वाढवणार आहे. हाय फ्लो ऑक्सिजनचे 8 युनिट असून प्रत्येक बेडला ऑक्सिजन पुरवठ्यासाठी 6 हजार लिटरची ऑक्सिजन टाकी बसवण्याचं काम सुरू आहे. याचा रुग्णांना निश्‍चितच रुग्णांना लाभ होणार असून भविष्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही. 50 बेडच्या अतिदक्षता विभागासह 300 बेडचं सुसज्ज रुग्णालय बनवण्यासाठी प्रयत्नशिल आहे. 

हे वाचून तर बघा....

आयजीएम रुग्णालय सक्षमीकरणासाठी शासन दरबारी वारंवार पाठपुरावा सुरू असला तरी त्याला कोल्हापूर जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांकडून म्हणवा तितका प्रतिसाद मिळत नाही. ते राज्याचे मंत्री असताना केवळ आपल्या मतदार संघाच्या विकासातच गुंतुण राहिले आहेत. समाजहिताचं काम करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला डावलण्याचा प्रयत्न होतो. त्यापैकी एक म्हणजे आयजीएम मधील 42 कर्मचार्‍यांचा प्रश्‍न रखडल्याचा आरोपही आवाडे यांनी केला.

कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असला तरी सध्या इचलकरंजी शहराला लॉकडाऊन परवडणारं नाही. त्यामुळं लॉकडाऊनला सर्वांचा विरोध आहे. आता उद्योग व्यवसाय सुरळीत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना लॉकडाऊन नव्हे तर जागृकपणे नियमांची अंमलबजावणी होणं गरजेचं असल्याचंंही त्यांनी सांगितलं. यावेळी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, सुनील पाटील, बाळासाहेब कलगाते, अहमद मुजावर उपस्थित होते.