Main Featured

इचलकरंजी मध्ये जनता कर्फ्यु योग्य आहे का ?


 

                                               Screenshot_20200908_192203

ताराराणी पक्ष कार्यालय इचलकरंजी येथे आमदार प्रकाशआण्णा आवाडे  (Prakash Awade) यांनी कोरोनावर मात करून पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला.

सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात इतर भागात जनता कर्फ्यु सुरु आहे. पण इचलकरंजीची परिस्थिती लक्षात घेता, उद्योगधंदे  व व्यापार सुरळीत चालु झाले असल्यामुळे इचलकरंजी मध्ये जनता कर्फ्यु करणे योग्य नाही, असे मत आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांनी मांडले.


गोरगरीबांसाठी आयजीएम हॉस्पिटल हे कोरोना उपचारासाठी उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे हे हॉस्पिटल जिल्हा रुग्णालय होण्यासाठी आमदार प्रकाशआण्णा आवाडे प्रयत्न सुरु आहेत.या पत्रकार परिषदेस जिल्हा परिषद सदस्य राहुल प्रकाश आवाडे ,ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, नगरसेवक सुनील पाटील, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, कपिल शेटके व पत्रकार उपस्थित होते.


हे वाचून तर बघा....