Main Featured

प्लास्टीक श्रेडींग मशिन विना वापर धुळखात


ichalkaranji corporation

 इचलकरंजी येथे प्लास्टीक कचरा बारीक करुन ते बारीक तुकडे दर्जेदार रस्ता डांबरीकरणासाठी वापरावेत म्हणून दोन बँकांनी पालिकेला प्लास्टीक श्रेडींग मशिन (Plastic shredding machine) भेट दिल्या होत्या. मात्र त्या दिड वर्षांपासून विना वापर पडूनच असल्याचं (Dust without using plastic shredding machine)नगरसेवक शशांक बावचकर यांनी केलेल्या पाहणीत स्पष्ट झालं. त्यामुळं त्या मशिनचा वापर करुन प्लास्टीक कचर्‍यामुळं होणार्‍या पर्यावरणाच्या हाणीस पायबंध घालावा आणि सदर मशिन कोणाच्या दुर्लक्षामुळं बंद आहेत त्याची चौकशी करुन संबंधितावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी पालिकेकडे केली आहे.

Must Read

वाद्यांच्या गजरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

आयटीआयची बुधवारपासून प्रवेशाची पहिली फेरी

आरोग्य राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच करोनाची स्थिती मोठी चिंताजनक

कोल्हापुरात करोना रुग्णांमागील संपर्क शोधण्यावर भर

पालिकेस 2019 सालच्या स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत एचडीएफसी आणि आयडीबीआय बँकेने डिसेंबर 2018 मध्ये प्लास्टीक श्रेडींग मशिन भेट दिल्या होत्या. या मशिनमध्ये प्लॉस्टिक कचर्‍याचे तुकडे होतात आणि ते तुकडे रस्ता डांबरीकरणामध्ये वापरल्याने रस्ता मजबुत होतो. (Dust without using plastic shredding machine)रस्ते मजबतुकरणाबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देशही दिले आहेत. बँकानी दिलेल्या प्लास्टीक श्रेडींग मशिनचं 24 डिसेंबर 2018 रोजी दिमाखात उद्घाटन करण्यात आलं. मात्र त्यानंतर त्या कचरा डेपोवर विना वापर धुळखात पडल्या आहेत.