Main Featured

कागल तालुक्यापाठोपाठ आता गडहिंग्लज तालुक्यातही लॉकडाऊन


                                       corona virus: Locked down in Gadhinglaj taluka along with Kagal taluka | corona virus : कागल तालुक्यापाठोपाठ आता गडहिंग्लज तालुक्यातही लॉकडाऊन 

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यापाठोपाठ आता गडहिंग्लज तालुक्यातही दि. ७ ते १६ सप्टेंबरअखेर कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आाला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून, त्याचा आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १९ रुग्णांचा मृत्यू झाला, तर नवीन ५५२ संक्रमित रुग्ण आढळून आले.

कागल तालुक्यात  रविवारपासून जनता कर्फ्यू लागू होत आहे. सलग १० दिवस या दोन्ही तालुक्यांतील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. आता गडहिंग्लज तालुक्यातही दि. ७ ते १६ सप्टेंबरअखेर कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आाला आहे.

कोल्हापूर व इचलकरंजी शहरांत कोरोनाचा फैलाव झपाट्याने झाल्यानंतर ग्रामीण भागातही त्याने आता चांगलेच पाय पसरले आहेत. त्यामुळे तालुका पातळीवर आता स्वतंत्र निर्णय घेतले जाऊ लागले आहेत.