Main Featured

इचलकरंजीला शुक्रवारी काही प्रमाणात दिलासा                                   Corona Update: More than 77 thousand new cases a day total number of  infected crosses 34 lakhs

इचलकरंजी येथे गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्या वाढ झाल्याने शहरवासियांच्या चिंतेत भर पडली होती. मात्र शुक्रवारी काही प्रमाणात दिलासा मिळाला. 24 तासात शहरातील विविध 15 भागात 18 जणांना कोरोनाची लागण झाली तर 4 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये गावभाग, तोडकर मळा भागात राहणारी 70 वर्षीय महिला, यशवंत कॉलनी परिसरातील 53 वर्षीय पुरूष, तांबे माळ परिसरातील 82 वर्षीय व दत्तनगरमधील  62 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

 आज अखेर 2,749 रूग्ण आढळून आले. त्यापैकी 2223 रूग्ण कोरोनावर यशस्वी मात करत घरी परतले. तर सध्या 398 जणांवर उपचार सुरू आहेत.  तर आज अखेर 128 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात खंजिरे मळा,  जुना चंदूर रोड परिसरात  प्रत्येकी 2 तर  विक्रमनगर, सहारानगर, सरस्वती मार्केट, घोरपडे नाट्यगृह मागे, शहापूर चौक, दत्तनगर गावभाग परिसर, ऋतुराज कॉलनी, आसरानगर, कुरू कन्नननगर, पाटील मळा, सुरभी कॉलनी, आयजीएम कॉटर्स, सावली सोसायटी आदी भागात प्रत्येक एक रूग्ण आढळून आला.