Main Featured

चोरट्यांना शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान


                                        Costs keep rising as load shedding makes battery theft easy – telecom firms  | Knysna-Plett Herald

 

 इचलकरंजी येथे नगरपालिकेच्या 8 घंटागाडी वाहनातील प्रत्येकी 1500 रुपये किंमतीच्या बॅटर्‍या चोरट्यांनी लांबवल्या आहेत. 12 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याबाबत हेमंत दिलीप कांबळे (रा. अवधुत आखाडा) यांनी गावभाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सीईटीपी प्रकल्पासमोर क्रांती गारमेंटच्या इमारत आवारात पालिकेच्या घंटागाडी पार्किंग केल्या जातात. पहाटेच्या सुमारास 8 घंटागाडी वाहनातील बॅटर्‍या चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. एकाच आठही वाहनातील बॅटर्‍या चोरीस गेल्याने चोरट्यांना शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.