Main Featured

विनयभंग करणार्‍या 15 वर्षीय अल्पवयीन मुलास चोप : पोलिसांच्या स्वाधीन


                                     rape | Living India News

 इचलकरंजी येथे  चारवर्षीय बलिकेशी अश्‍लील चाळे करून तिचा विनयभंग करणार्‍या 15 वर्षीय अल्पवयीन मुलास चोप देऊन नागरिकांनी इचलकरंजीतील गावभाग पोलिसांच्या स्वाधीन केलं. ही घटना लालनगर परिसरात घडली असून याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयिता विरोधात गुन्हा दाखल करून त्याची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.

येथील लालनगर परिसरात चारवर्षीय बालिका आणि संशयित अल्पवयीन मुलगाही वास्तव्यास आहे. अल्पवयीन मुलानं त्या बलिकेला   लैंगिक शोषणाच्या उद्देशानं 1 सप्टेंबर रोजी नजीकच्या सिइटीपी प्रकल्पासमोर घटागाडी पार्किंग करत असलेल्या इमारतीत नेलं. तिच्याशी अश्‍लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याचं घटना पाहणार्‍या काही अल्पवयीन मुलांनी पालकांना सांगितलं. त्यामुळं नागरीकांनी त्या अल्पवयीन मुलाचा शोध घेऊन त्याला चोप देत गावभाग पोलिसांच्या स्वाधीन केलं. त्याच्यावर विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून संशयीत मुलाची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.