Main Featured

कापडाचे तागे चोरी प्रकरणी दोघांना अटक


                                   Theft at two Noida apartments | Cities News,The Indian Express


इचलकरंजी येथील पॉवरलुम कारखान्यातून कापडाचे तागे चोरी प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोघांना अटक केली. गजानन मनगुत्ती आणि वैभव खरबुडे अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्याकडून चोरीस गेलेले कापडाचे 7 तागे पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

येथील लंगोटेे मळ्यातील पॉवरलूम कारखान्याच्या शेडमधून 17 ऑगस्ट रोजी कापडाचे 7 तागे चोरीस गेले होते. याबाबत दातार मळ्यातील राजेश जाधव यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास करताना गजानन मनगुत्ती आणि वैभव खरबुडे हे दोघे संशयीत मिळून आले. चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेले कापडाचे 7 तागे हस्तगत केले आहेत.