Main Featured

इचलकरंजीत गृह विलगीकरणातून इतके जण झाले कोरोनामुक्त

Ichalkaranji  home quarantine corona free


Ichalkaranji - शहरात तब्बल 389 रुग्ण घरीच उपचार घेवून कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 68 रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. गृह विलगीकरणात  (home quarantine) उपचार घेण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला प्रतिसाद मिळाला आहे. लक्षणे नसणाऱ्या अथवा सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर घरी उपचार करण्यात येत आहेत.


शहरात कोरोनाचा संसर्ग अद्याप थांबलेला नाही. जून अखेरीस कुडचे मळा येथून सुरु झालेल्या समुह संसर्गाने शहर व्यापले आहे. दिवसेंदिवस संख्या वाढतच गेल्यामुळे एकवेळ आयजीएम रुग्णालयासह कोरोना उपचार केंद्रामध्ये बेड मिळणे मुश्‍कील झाले होते. त्याचा ताण आरोग्य यंत्रणेवर पडला होता. यामुळे गरजू रुग्णांवर उपचार करताना अडचणी येत होत्या.

Must Read

या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून घरीच विलगीकरणात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी दिली. साधारणपणे कोरोनाची कोणतीही लक्षणे नसणाऱ्या अथवा सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर घरीच उपचार  (home quarantine) करण्यास सुरुवात केली. घरामध्ये आवश्‍यक सुविधा असलेल्या रुग्णांनाच यासाठी परवानगी दिली. खासगी डॉक्‍टरांच्या सहकार्याने अनेकांनी घरीच उपचार घेतले.

यामुळे गरजू रुग्णांना बेड उपलब्ध झाले. आतापर्यंत 457 रुग्णांनी घरीच उपचार घेतले आहेत. त्यातील 389 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता केवळ 68 रुग्ण घरी उपचार घेत आहेत. दुसरीकडे रुग्णालयात होणारी गर्दी पाहता घरीच उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, पालिकेच्या डीकेटीई कोविड केअर सेंटरमधून आतापर्यंत 3243 जण उपचार घेवून कोरोनामुक्त झाले आहेत. मुसळे कोविड केअर सेंटरमधूनही 622 जण कोरोनावर मात केल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांनी दिली.