ichalkaranji nagarparishadIchalkaranji- जयभीमनगरमधील उर्वरित 108 घरकुलांच्या प्रलंबित प्रश्‍नांबाबत आज लाभार्थ्यांनी (pradhan mantri awas yojana)पालिकेवर मोर्चा काढून हल्लाबोल आंदोलन केले. दसऱ्यापर्यंत घरकुलांच्या पायाभरणीचा कार्यक्रम न झाल्यास नगराध्यक्षांच्या दालनातच भूमिपूजन करण्याचा इशारा लाभार्थी आंदोलकांनी दिला. आवश्‍यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून दोन महिन्यांत या घरकुलांच्या बांधकामास प्रारंभ करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. 

जयभीमनगर येथे केंद्र शासनाच्या योजनेतून 720 घरकुले बांधण्याचा प्रस्ताव मंजूर (pradhan mantri awas yojana) केला होता. त्यापैकी 612 घरकुले बांधून पूर्ण झाली असून, तेथे सध्या लाभार्थी राहत आहेत; पण अद्याप 108 घरकुलांचा प्रश्‍न प्रलंबित आहे. याबाबत लाभार्थ्यांनी सातत्याने आंदोलने केली आहेत; मात्र याबाबत ठोस कृती झालेली नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे. 


Must Read

1) शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

2) आता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार ...

3) 'पुढच्या 5 मिनिटात आमदार निवास बॉम्बने उडवून टाकू

4) UC Browser ला मिळाला स्वदेशी पर्याय लाखो युझर्सनं केलं डाउनलोड

5) ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो

या पार्श्‍वभूमीवर आज लाभार्थ्यांनी पालिकेवर मोर्चा काढून हल्लाबोल आंदोलन केले. प्रलंबित घरकुले कधी होणार, असा जाब विचारत लाभार्थ्यांनी संपप्त भावना व्यक्त केल्या. याबाबत ठोस निर्णय झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची भूमिका घेतली. सध्या या योजनेसाठी आलेल्या अनुदानाच्या व्याजाची रक्कम अन्य कामांसाठी वापरण्यात येत असल्याच्या चर्चेबाबतचा प्रश्‍न लाभार्थ्यांनी उपस्थित केला. हा निधी अन्यत्र कुठेही वापरण्यात येणार नाही, असे नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी सांगितले. 

व्याजाची रक्कम उर्वरित घरकुलांसाठी वापरण्याबाबत प्रशासकीय मंजुरी घेण्याबाबत निर्णय झाला. त्यानंतर पुढील निविदा प्रक्रिया राबविण्याबाबत चर्चा झाली. यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील निवेदन नगराध्यक्षा स्वामी यांना दिले. उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, नगरसेवक सुनील पाटील, शशांक बावचकर, संजय कांबळे, राहुल खंजीरे, अब्राहम आवळे, प्रकाश मोरबाळे, संजय केंगार यांच्यासह नगर अभियंता संजय बागडे यांनी चर्चेत भाग घेतला.