Main Featured

इचलकरंजी नगरपरिषदेकडून विशेष ॲपइचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने सुरू करणेत आलेल्या इंटिग्रेटेड कोव्हिड १९ मॅनेजमेंट सिस्टम (ICMS) या ॲप्लिके शनचा शुभारंभ नुकताच जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सतेज पाटील यांच्या हस्ते करणेत आले. या ॲप्लिकेशनवर इचलकरंजी शहरातील शासनाने अधिसूचित केलेल्या ८० टक्के खाटांचे उपलब्धता तसेच कोव्हिड १९ च्या रुग्णांच्या संख्येची माहिती उपलब्ध होईल.त्याचबरोबर नागरिकांना हॉस्पिटलमधील बिला संबंधी किंवा हॉस्पिटल मधील खाटांच्या उपलब्धतेविषयी अथवा अन्य कोणत्याही प्रकारची तक्रार करावयाची असल्यास सदर ॲपवर नागरिक आपली तक्रार ऑनलाइन नोंदवू शकतात.
सदर ॲप्लिकेशन उद्या दि.१४ सप्टेंबर पासून गूगल प्ले स्टोर (Google play store) वरुन डाउनलोड करून घेता येईल तसेच इचलकरंजी नगरपरिषदेच्या वेबसाईट वरून सुद्धा डाऊनलोड करता येईल.

याप्रसंगी आमदार प्रकाश आवाडे,आमदार राजुबाबा आवळे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार राजीव आवळे, नगराध्यक्षा ॲड.अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, मुख्य अधिकारी संतोष खांडेकर,अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी.केंपी पाटील, तहसीलदार प्रदिप उबाळे, जेष्ठ नगरसेवक मदन कारंडे, सागर चाळके,सुनिल पाटील, रविंद्र माने,महादेव गौड, आरोग्य अधिकारी डॉ, सुनिलदत संगेवार आदी मान्यवर उपस्थित होते. अशी माहिती नगरपरिषदेचे जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली.


शहरातील नागरिकांनी सदर ॲप्लिकेशन सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून करणेत येत आहे.