Main Featured

सरकारवर केल्या जाणार्‍या आरोपाला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा


                                      ichalkarani igm

इचलकरंजी येथील  2019 पूर्वीचे आयजीएम आणि सद्यस्थितीतील आयजीएम हॉस्पिटल याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. दवाखान्यातील सोयी सुविधा आणि सक्षमीकरण करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेच (Previous IGM and current IGM)निधी दिला आहे. त्यामुळे सहाजीकच जिल्ह्यातील तिन्ही जबाबदार मंत्र्यांच्या मान्यतेनुसारच हा विकास निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे इचलकरंजीवर तीन मंत्र्यांनी नेमका कोणता अन्याय केला हे आमदार प्रकाश आवाडे  (Prakash Awade) यांनी उदाहरणासह स्पष्ट करावे, असे आवाहन आज महाविकास आघाडीच्यावतीने आयोजित पत्रकार बैठकीत शशांक बावचकर, मदन कारंडे, महादेव गौड यांनी दिले. यावेळी आमदार आवाडे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध देखील करण्यात आला.

कोविड सारख्या साथीच्या काळात आयजीएम सक्षमीकरणासाठी जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी महाविकास आघाडी आज पत्रकार बैठक घेतली. त्यामध्ये बोलताना बावचकर म्हणाले, कुठेतरी जाणीवपूर्वक इंन्ट्री करण्यासाठी आवाडे असे प्रकार करतात. बिनबुडाचे आरोप करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची यातून काही साध्य होणार नाही. महाविकास आघाडी सरकारने शहरातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आणि आयजीएम सक्षमीकरणासाठी विडा उचलला आहे. मुळात न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या 42 कर्मचार्‍यांचा विषय पुढे करून आयजीएम अधिष्ठाता शेट्ये यांच्या बदलीचे प्रयत्न होतात का याचा प्रयोग आवाडे करत आहेत. तिन्ही मंत्री इचलकरंजीवर सातत्याने लक्ष ठेवून असून त्यांच्या माध्यमातून शहराला भरीव निधी प्राप्त होत आहे. आमदार किंवा खासदार या लोकप्रतिनिधींचे कामचं निधीचा पाठपुरावा करण्याचे असते. त्यामुळे आमदार आवाडे यांनी श्रेयवाद करू नये. निधी प्राप्त होतो तो शासनामुळे.

Must Read

मदन कारंडे यांनी बोलताना आवाडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत राज्यातील शासन स्थापन झाल्यापासून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी किमान 15-20 वेळा आयजीएम दवाखान्याला भेट दिली आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच आयजीएम सक्षमीकरणाचे काम (Previous IGM and current IGM)प्रगतीपथावर आहे. स्वत:ची जबाबदारी झटकत इतरांना दोष द्यायचे बंद करून आवाडे यांना जनतेचा इतका कळवळा असेल तर राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जवाहर कारखान्याच्यावतीने कोविड सेंटर उभा करावे.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महादेव गौड यांनी आमदार आवाडे यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे (Uddhavji Thackeray), खासदार धैर्यशील माने (Dhairyashil Mane), तत्कालीन आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी आयजीएम संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली आहे. शासनाने आयजीएमसाठी भरीव निधी दिला आहे. हे न सांगता आवाडे आपली प्रसिद्धी मिळवण्यासाठी सरकारची (Previous IGM and current IGM)बदनामी करण्यात मग्न झाल्याचा आरोप केला. या पुढे देखील सरकारवर केल्या जाणार्‍या आरोपाला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा देखील यावेळी पत्रकार बैठकीत देण्यात आला.  पत्रकार बैठकीस रविंद्र माने, राहुल खंजिरे, प्रकाश पाटील, संभाजी सुर्यवंशी उपस्थित होते.