Main Featured

शहरात कोरोना रूग्ण संख्येत घट


                                                corona in ichalkaranji

corona in ichalkaranji : गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजी शहरात कोरोना रूग्ण संख्येत घट होताना दिसून येत आहे. त्यामुळे शहरवासियांना सध्या दिलासा मिळत आहे. सोमवारी एकूण 13 रूग्णांची भर पडली. तर त्यातील एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे आजअखेर 3567 रूग्णांची संख्या झाली आहे. तर कोरोनावर उपचार घेऊन 2839 जण घरी परतले आहेत. सध्या 555 जणांवर उपचार सुरू आहेत. तर मृतांची संख्या 173 वर पोहोचली आहे.

Must Read


 

आज दिवसभरात शहापूर 3, भोनेमाळ 2, तर नदीवेस, यशवंत कॉलनी, लालनगर, सातपुते गल्ली, गणेशनगर, विठ्ठलनगर, संजीवनी हॉस्पिटल परिसरात प्रत्येकी 1 रूग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात कोल्हापूर खालोखाल इचलकरंजीमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण सापडत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होतेे. कोरोनाचे रूग्ण कमी होण्याच्यादृष्टीने प्रशासनाच्यावतीने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने रूग्णांची संख्या कमी होताना दिसून येत आहे.