Main Featured

खाजगी लॅबमध्ये कोरोना संबधीत वैद्यकीय चाचण्यांचे दर भरमसाठ                              private  lab medical test

इचलकरंजीतील काही खाजगी दवाखाने आणि लॅब मधून कोरोना संबधीत केल्या जाणाऱ्या वैद्यकीय चाचण्यां (Medical tests) चे दर भरमसाठ प्रमाणात आकारले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांतून केल्या जात आहेत, त्याची खातरजमा करून चाचण्यांचे दर नियंत्रित ठेवून भरमसाठ रक्कम आकारणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी 

शशांक बावचकर, मदन कारंडे,महादेव गौड यांनी मुख्यधिकारी संतोष खांडेकर यांचेकडे केली आहे.कोव्हीड 19 च्या संसर्गजन्या (Medical test rates are plentiful)आजारामुळे इचलकरंजी शहरामधील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. 23 जुन 2020 पासून इचलकरंजी शहरामध्ये या आजाराचा मोठया प्रमाणावर फैलाव झालेला आहे. सद्याची रुग्ण संख्या ही 2800 वर गेलेली आहे. अशा परिस्थितीत खाजगी हॉस्पीटल कडून होणा-या अनेक चाचण्याचे दर हे भरमसाठ आकारले जात आहेत. 

Must Read

इचलकरंजी शहरामध्ये कामगारांची संख्या मोठया प्रमाणावर असलेने सदरचे दर हे सर्वसामान्य माणसांना परवडणारे नाहीत. तथापी राज्यशासनाने कोव्हीड 19 च्या संदर्भामध्ये विविध तपासण्या व वेगवेगळे दर ठरवून दिलेले आहेत. परंतू इचलकरंजी शहरातील खाजगी हॉस्पीटलमध्ये व तपासणी केंद्रामध्ये एच.आर.सी.टी. चे दर हे वेगवेगळया पध्दतीने चढया दराने आकारले जात आहेत. 

सर्वसामान्य माणसांमध्ये याबाबत तिव्र असंतोष असून पुढील काळात याअसंतोषाचा उद्रेक होण्याची चिन्हे दिसत आहेत. सबब आपण इचलकरंजी (Medical test rates are plentiful)प्रशासनाचे प्रमुख म्हणून खाजगी तपासणी केंद्राकडून आकारले जाणारे दर व रुग्णांची होणारी लुट लक्षात घेवून आपल्या भरारी पथका मार्फत याची चौकशी करावी. व संबंधीत तपासणी केंद्र जादा दराने आकारणी करीत असतील तर त्यांचेवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.