Main Featured

जगातील सर्वोत्तम क्रिकेट संघावर पुन्हा येणार बंदी?


                                         South African cricket

 दक्षिण  आफ्रिकेतील ऑलिंपिकशी संबंधित संस्थेने क्रिकेट साउथ आफ्रिका बोर्डाला निलंबित केले आहे. दक्षिण आफ्रिका स्पोर्ट्स अॅण्ड ऑलिंपिक समितीने या कारवाईमुळे दक्षिण आफ्रिकेतील क्रिकेट बोर्डाची प्रतिमा खराब जाली आहे. एवढच नव्हे तर आता(World's best cricket team banned again?) आफ्रिकेच्या संघावर आंतरराष्ट्रीय बंदीचे संकट आले आहे.

जागतिक क्रिकेटवर नियंत्रण ठेवणाऱ्या आयसीसी च्या नियमानुसार कोणत्याही क्रिकेट खेळणाऱ्या देशातील क्रिकेटचे कामकाज पाहणारी स्वतंत्र संस्था हवी. सरकार अथवा अन्य संस्थेचे त्यावर थेट नियंत्रण असता कामा नये.

याआधी आफ्रिकेच्या संघावर २१ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर बसण्याची वेळ आली होती. त्यानंतर १९९१ साली त्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. वर्णद्वेषामुळे आफ्रिकेवर बंदी घातली होती. तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने असे काही नियम तयार केले होते ज्यामुळे बंदी घातली गेली.

हेही वाचा 

1) इचलकरंजीत "या' संघटना आक्रमक, केली जोरदार निदर्शने

2) कोल्हापूरकरांची चिंता वाढली

3) काय आहे कोल्हापुराच्या जनता कर्फ्युची परिस्थिती

4) कोल्हापूरात तरुणाचा निर्घृण खून

5) सांगलीत जनता कर्फ्यूचा उडाला बोजवारा


सरकारच्या नियमानुसार आफ्रिकेचा संघ फक्त इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघाविरुद्ध क्रिकेटचे सामने खेळेल. त्याच बरोबर प्रतिस्पर्धी संघात एकही काळ्या रंगाचा खेळाडू नसेल. या नियमामुळे आयसीसीने दक्षिण (World's best cricket team banned again?) आफ्रिकेवर बंदी घातील. यामुळे खेळाडूंचे भविष्य धोक्यात आले. तेव्हा देशातील अनेक क्रिकेटपटूंचे करिअर बंदी कधी हटले यात वाया गेले. अखेर २१ वर्षांनी सरकारने नियम बदलल्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळता आले.

आता पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेने आयसीसीचा नियम मोडला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. कारण ऑलिंपिक समितीची कारवाई ही सरकारचा हस्तक्षेप मानला जाऊ शकतो. आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने देखील या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे.

क्रिकेट बोर्ड का निलंबित केले


गेल्या काही दिवसापासून आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डात अंतर्गत वाद सुरू आहे. यामुळे सरकारने क्रिकेट बोर्डाला निलंबित केले आणि त्याचे व्यवस्थापन स्वत:च्या ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघावर मान्यतेची टांगती तलवार आहे.

दक्षिण आफ्रिकन कंफेडरेशन अॅण्ड ऑलिंपिक कमिटीने क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला पत्र लिहून याबाबत कळवले आहे. बोर्डातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रशासनातून बाहेर पडण्यास सांगितले आहे. गेल्या डिसेंबरपासून बोर्डात अनेक चूकीच्या यात गैरव्यवहार आणि वर्णद्वेष या गोष्टींचा समावेश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बोर्डात सुरू असलेल्या गोष्टींची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.