Main Featured

IPO बाजाराला भरती; आज या तीन कंपन्यांचे आयपीओ धडकले



करोना (corona)रोखण्यासाठी लागू केलेले लॉकडाउन सरल्यानंतर हळूहळू कॉर्पोरेट कंपन्यांनी निधी उभारणीसाठी प्राथमिक बाजाराकडे गर्दी करू लागल्या आहेत. मागील सहा महिने सुस्त असलेल्या प्राथमिक बाजाराला चालना मिळाली असून आयपीओ (IPO)योजनांची रेलचेल वाढली आहे. 


दोन आठवड्यात बाजारात दाखल झालेल्या हॅप्पीएस्ट माइंड टेक्नॉलॉजी, एंजेल ब्रोकिंग, कॅम्स या कंपन्यांच्या आयपीओमधून (IPO)दमदार निधी उभारणी केली. त्याचबरोबर बंपर नोंदणी करुन गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी भरघोस परतावा दिला आहे. या जोरदार लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांचा उत्साह दुणावला आहे. 

Must Read

1) शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

2) आता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार ...

3) 'पुढच्या 5 मिनिटात आमदार निवास बॉम्बने उडवून टाकू

4) UC Browser ला मिळाला स्वदेशी पर्याय लाखो युझर्सनं केलं डाउनलोड

5) ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो

आज मंगळवारी भांडवली बाजारात माझगाव डॉक, लिखिता इन्फ्रास्ट्रक्चर आणि युटीआय असेट मॅनेजमेंट या तीन कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. दोन आठवड्यात तीन आयपीओ (IPO)योजनांना गुंतवणूकदारांकडून १०० टक्क्यांहून अधिक प्रतिसाद मिळाला आहे.

माझगाव डाॅक शिपबिल्डर्स

संरक्षण क्षेत्रातील सरकारचा उपक्रम असलेल्या माझगाव डाॅक शिपबिल्डर्सचा आयपीओ आज खुला होणार आहे. या आयपीओसाठी १३५ ते १४५ रुपये प्रती शेअर किंमतपट्टा आहे. या योजनेत ३०५९९०१७ शेअर्सची विक्री करुन ४४४ कोटींचा निधी उभारला जाईल. किमान १०३ शेअरसाठी गुंतवणूकदार अर्ज करू शकतात. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलासाठी जहाज बांधणी, पाणबुडीची निर्मिती आणि त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम माझगाव डॉककडून मुंबईत केले जाते.

यूटीआय अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचा आयपीओ


मत्ता व्यवस्थापन कंपन्यांमध्ये (एएमसी) दुसऱ्या क्रमांकाची एएमसी असलेल्या यूटीआय अॅसेट मॅनेजमेंट कंपनी (एएमसी) लिमिटेडची भागविक्री २९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आयपीओसाठी प्रति समभाग ५५२ ते ५५४ रुपये दरपट्टा निश्चित केला आहे.या आयपीओअंतर्गत ३,८९,८७,०८१ समभाग (इक्विटी शेअर्स) विक्रीला काढले आहेत.आयपीओ अंतर्गत यूटीआय एएमसीचे समभाग खरेदी करण्यास उत्सुक असलेल्या गुंतवणूकदारांना किमान २७ समभागांसाठी किंवा २७ च्या पटीत समभाग खरेदीसाठी मागणी नोंदवावी लागेल.

लिखिता इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची आयपीओ योजना

तेल आणि वायू वाहिनी पायाभूत सेवा पुरवठादार असेलेल्या लिखिता इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने प्रारंभिक समभाग विक्री योजना जाहीर केली आहे. यातून ६१.२० कोटींचा निधी उभारणार आहे. यासाठी प्रती शेअर ११७ ते १२० रुपये ठेवण्यात आला आहे. आज मंगळवारी २९ सप्टेंबर रोजी आयपीओ खुला होणार असून १ ऑक्टोबर रोजी बंद होईल. यातून जमा होणारा निधी खेळत्या भांडवलासाठी वापरला जाईल, असे कंपनीने म्हटलं आहे.