Main Featured

बॉलिवूड अभिनेता आणि त्याच्या कुटुंबाला करोनाची लागण

coronavirus

करोना विषाणूचं (coronavirus) संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान बॉलिवूड अभिनेता हिमांश कोहली (himansh kohli)आणि त्याच्या कुटुंबाला करोनाची लागण (corona positive) झाली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


यारीया या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेल्या हिमांशने (himansh kohli) इन्स्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली. “नमस्कार, माझा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मला करोनाची लक्षणं दिसत होती. सध्या मी १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईनमध्ये आहे. घरातच माझ्यावर उपचार सुरु आहेत. करोनाची लागण तुम्हाला कधीही कुठेही होऊ शकते त्यामुळे स्वच्छता राखा आणि स्वत:ची काळजी घ्या.” अशा आशयाची पोस्ट लिहून त्याने आपल्या चाहत्यांना करोनापासून सावधान केलं आहे.


भारतामध्ये दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची संख्या (corona positive) वाढतच चालली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४० लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांत देशात ८६ हजार ४३२ नवीन करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. महाराष्ट्रात, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि प. बंगालमध्ये करोनाबाधित रग्णांची संख्या वेगानं वाढत आहे.
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ८६ हजार ४३२ करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत.त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४० लाख २३ हजार १७९ इतकीझाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे ३१ देशात आतापर्यत लाख ७ हजार २२३ जणांनी करोनावर मात केली आहे. ८ लाख ४६ हजार ३९५ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.