Main Featured

Health tips – खडीसाखर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे वाचून व्हाल अवाक, जाणून घ्या


 

benefits-of-rock-candy-khadisakharसाखरेचे क्रिस्टल रुपातील खडे म्हणजे खडीसाखर (Rock suger). मुख्यतः हिंदुस्थान आणि पार्शिया (Persiaमध्ये याचे उत्पादन घेतले जाते. चवीला गोड असणाऱ्या खडीसाखरेत औषधी गुणधर्म देखील आहेत. आयुर्वेदात खडीसाखरेचे थंड, पौष्टिक, गोड, हलकी,  बलवर्धक, डोळ्यांना हितकारक, उलटीवर उपयुक्त असे आरोग्यदायी गुणधर्म सांगितले आहेत.

1. खडीसाखर चघळल्यास कफा (Phlegmचा त्रास कमी होतो, घशातील खवखव, खोकला दूर होतो.

2. ताणतणाव हलका होण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास खडीसाखर खावी.

3. काळीमिरी आणि खडीसाखर समप्रमाणात घेऊन एकत्र वाटावी. या मिश्रणाची बारीक पूड तयार करा. चहामध्ये हे मिश्रण एकत्र करून प्यावे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

Advertise

Must Read

1) शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

2) आता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार ...

3) 'पुढच्या 5 मिनिटात आमदार निवास बॉम्बने उडवून टाकू

4) UC Browser ला मिळाला स्वदेशी पर्याय लाखो युझर्सनं केलं डाउनलोड

5) ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो

4. खडीसाखर कच्च्या स्वरूपातील साखर आहे. त्यामुळे साखरेपेक्षा खडीसाखर खाणे अधिक फायदेशीर ठरते.

5. उन्हाळ्यात उत्साहवर्धक पेय  बनवण्यासाठी खडीसाखर वापरतात. ग्लासभर पाण्यात खडीसाखरेची पूड मिसळून ते पाणी प्यायल्याने शरीरात थंडावा निर्माण होतो. तहान भागते. ताण हलका होतो.

6. खडीसाखर आणि तूप मिसळलेले दूध प्यायले असता दाह, मूत्ररोग (Urologic) असे विकार बरे होतात.

7. खडीसाखर, धने पाण्यात टाकून उकळवावेत. तासभर हे पाणी तसेच ठेवावे. नंतर गाळून बाटलीत भरून ठेवावे. त्याचे 2-2 थेंब डोळ्यात टाकल्यास डोळे दुखायचे थांबतात. डोळ्यांच्या तक्रारी कमी होतात.

8. ऍसिडिटीचा त्रास झाल्यास दोन चिमूटभर जिरे आणि खडीसाखर खाल्ल्याने आराम मिळतो.

9. मुखवासासाठी बडीशेपसोबत खडीसाखर खावी.