Main Featured

सकाळी उठल्यावर डोळे का सुजतात? या गोष्टींकडे द्या लक्ष


health-food-Why-do-eyes-swell-when-you-wake-up-in-the-morning

health food डोळ्यांची सूज येणे अगदी सामान्य आहे कारण डोळ्यांच्या सभोवतालची त्वचा Skin खूपच संवेदनशील असते. एलर्जी, तणाव, थकवा, तसेच डोळ्यांच्या खालील त्वचेत द्रव जमा झाल्याने आणि इतर कारणांमुळे डोळ्यांना सूज येऊ शकते. सकाळी उठल्यावर बर्‍याचदा डोळे Eyes सुजलेले दिसतात. जेव्हा आहारात सोडियमचं प्रमाण जास्त होतं तेव्हा शरीरात पाणी साठण्यास सुरुवात होते. कधीकधी झोपेची कमतरता किंवा जास्त प्रमाणात मद्यपान केल्यामुळे डोळ्यात जळजळ होऊ शकते. myupchar.com शी बोलताना एम्सचे डॉ. अजय मोहन म्हणतात की, डोळ्यांमध्ये सूज येण्याची लक्षणं म्हणजे डोळ्यांना खाज सुटणे आणि जळजळ होणे, डोळे लाल होणे आणि सूज येणे, जास्त अश्रू येणे, दिसण्यात अडचण येणे, पापण्या कोरड्या होणे, डोळ्याखालील गडद काळं रिंगण येणे अशी आहेत.

डोळ्यांच्या खालची सूज ही वाढत्या वयामुळे देखील असू शकते. या स्थितीचं कारण काहीही असले तरी डोळ्यांची सूज नाहिशी करणं शक्य आहे. डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय मदत करू शकतात.

पाण्याच्या प्रमाणाकडे लक्ष द्या

myupchar.com चे डॉ.अप्रतिम गोयल म्हणतात की, दररोज किमान 2 ते 3 लिटर पाणी प्यावं. जर डोळे सुजले असतील तर आपण किती पाणी पिताय याकडे लक्ष द्या. भरपूर पाणी प्या कारण त्वचेखाली साठलेलं द्रव त्याच्या जळजळ होण्याचं मुख्य कारण आहे. पुरेसं पाणी प्यायल्यानं शरीरातील द्रव टिकून राहतात आणि ते ऊतींमध्ये जमा होत नाही.

सोडियमचं प्रमाण कमी असावे

जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने शरीरात द्रव साचतो आणि बर्‍याच अडचणी उद्भवतात. सूज येणं टाळण्यासाठी खाद्य पदार्थांमध्ये मीठ मर्यादित ठेवा.

आहारात जीवनसत्त्वे समाविष्ट करा

अ जीवनसत्त्व डोळ्यांची जळजळ आणि डोळ्याभोवती गडद वर्तुळं निवारण्यासाठी मदत करतं. जीवनसत्त्व कोलेजेनच्या प्रक्रियेस उत्तेजन देतं ज्यामुळे डोळ्यांखाली असलेल्या त्वचेचे आरोग्य सुधारतं. हिरव्या भाज्या, बीट, गाजर आणि चिंचेपासून ते मिळवलं पाहिजे. लिंबू, संत्र इत्यादी आंबट फळं खाल्यानंतर पुरेसे ई जीवनसत्त्व आणि सी जीवनसत्त्व मिळतं. यामुळे डोळ्यांखालील त्वचेत रक्त प्रवाह वाढतो. त्वचेला पुरेसं पोषण मिळतं आणि जळजळ बरी होते. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला म्हणतात की जीवनसत्त्व के हिरव्या पालेभाज्या, मोहरीची भाजी, मुळा, गहू, बार्ली, पालक, ऑलिव्ह ऑईल, मोड आलेली कडधान्य यापासून मिळते.

काकडीचा उपयोग

काकडीचे काप कापून डोळ्यावर ठेवल्यास डोळ्याखालची सूज दूर होते. हा सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी घरगुती उपाय आहे. खरं तर, याचं कारण असं आहे की काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असतं. त्यात सुमारे 70 टक्के पाणी असतं. काकडी पाण्याची कमतरता कमी करून डोळ्यांखालील सूज दूर करते.

ग्रीन टी बॅग

ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे डोळ्यांखालील त्वचेतील जळजळ आणि लालसरपणा कमी करण्यास मदत करतात. डोळ्याखाली ग्रीन टी चे पाकीट 10-15 मिनिटे ठेवा. यामुळे डोळ्यांना आराम मिळेल.