Main Featured

लहान मुलांसाठी खूप उपयुक्त आहे ओवा


health-food-Ova-is-useful-for-small-children

health food 
लहानपणी आपल्या पोटात दुखू लागलं की आपली आजी किंवा आई आपल्याला ओवा Ova खायला द्यायची. प्रत्येकाला हे आठवत असेल. पोटाच्या कोणत्याही समस्या जाणवू लागल्या की ओवा खायचा सल्ला दिला जातो. ओवा खाल्ल्यानंतर पोटातील वेदनांपासून तात्पुरता आराम मिळतो.  ओवा अधिकतर मसाल्याच्या रूपात सर्वाधिक वापरला जातो. बंगाल, पंजाब, दक्षिण भारत India या प्रांतांमध्ये त्याचं उत्पादन जास्त आहे. आयुर्वेदात ओव्याचे बरेच फायदे सांगितले आहेत. ओव्याचे एक वैशिष्ट्यं म्हणजे ते शंभर प्रकारचं धान्यं पचवण्यास सक्षम आहे.

myupchar.com शी संबंधीत डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल यांच्या म्हणण्यानुसार ओव्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यासाठी मदत होते. ओव्यामध्ये प्रथिनं, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, राइबोफ्लेविन, थायमिन आणि खूप थोड्या प्रमाणात निकोटिनिक अॅसिड, आयोडीन, सेपोनिन, टॅनिन, केरोटीनही असतं. लहान मुलांमध्ये पोटाच्या अनेक समस्या असतात. त्यांच्यासाठी ओवा अत्यंत उपयुक्त आहे.

पोटातील कृमी दूर करण्यात मदत करतो

मुलांना बर्‍याचदा पोटातील कृमींचा त्रास होतो. यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे मुलांना गोड पदार्थ खूप आवडतात. गोड खाण्यामुळे त्यांच्या पोटात कृमी होतात. ओवा ह्या त्यावरील उपचारांमधील एक महत्त्वाचं आयुर्वेदिक औषध आहे. मुलांच्या पोटातील कृमी दूर करण्यासाठी त्यांना दिवसातून 3 वेळा सलग पाव चमचा खारट ओवा खायला द्या. याशिवाय झोपेच्या वेळी त्यांना 4-5 थेंब ओव्याचे तेल पाजा यामुळे पोटातील जंतांचा नाश होतो.

मुलांची माती खाण्याची सवय सुटेल

मुलांना माती किंवा खडू यासारख्या गोष्टी खायला आवडतात. त्यांना थांबवणं आणि या सवयीपासून मुक्त करणं खूप कठीण काम आहे. मात्र ओवा सेवन केल्याने ही सवय सोडवली जाऊ शकते. यासाठी दररोज रात्री त्यांना एक चमचा ओब्याचे चूर्ण तीन आठवड्यांपर्यंत झोपायच्या वेळी द्या. काही दिवसांतच त्यांची ही सवय नाहीशी होईल. जर घरातील मोठ्यांना अशी कोणतीही सवय असेल, तरीदेखील या उपायाचा अवलंब करू शकता.

पोटदुखीमध्ये मदत

मुलांमध्ये पोटदुखीसाठी ओवा हा एक प्रभावी उपाय आहे. एक ग्रॅम काळं मीठ आणि दोन ग्रॅम ओवा कोमट पाण्यातून पाजा. यामुळे त्यांना पोटदुखीपासून आराम मिळेल. ज्याला पोटदुखीचा त्रास असेल ते देखील हे मिश्रण वापरू शकतात.

खोकल्यापासून आराम

खोकल्याच्या समस्येमध्ये ओवा अधिक फायदेशीर आहे. खोकला झाल्यास एक चमचाभर ओवा योग्य प्रकारे चघळून खा आणि वरून गरम पाण्याचे सेवन करा. रात्री खूप खोकला येत असल्यास, सुपारीच्या पानातून अर्धा चमचा ओवा चघळून त्याचा रस गिळून टाका. यामुळे खोकला बरा होतो.

मुलांमध्ये अंथरुणावर लघवी करण्याच्या समस्येवर उपचार

बहुतेक मुलांमध्ये रात्री अंथरुणावर लघवी करण्याची समस्या मोठी झाल्यावर देखील राहते. या समस्येवर उपचार म्हणून ओवा फायदेशीर ठरेल. रात्री झोपण्यापूर्वी त्यांना रोज एक चमचा ओव्याचं चूर्ण देत रहा. काही काळानंतर ही सवय नाहीशी होईल.

myupchar.comशी संबंधीत डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल यांच्या म्हणण्यानुसार ओवांच्या सेवनाने शरीराला कुठलीच हानी होत नाही. मात्र काही लोकांना वाढत्या पित्ताची तात्पुरती समस्या भासू शकते. पोटाचा जुना आजार असल्यास ओव्याचं सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.