Main Featured

हातकणंगलेत सोमवारी रास्ता रोको

हातकणंगलेत सोमवारी रास्ता रोको

“मराठा समाजाच्या (Maratha)आरक्षणास सर्वोच्च न्यायालयात (supreme court)स्थगिती मिळाल्यानंतर आठवडा उलटला तरी पुढील धोरण ठरविण्याबाबत राज्य सरकार उदासीन आहे. जोपर्यंत आरक्षणावर शिक्कामोर्तब होत नाही. 


तोपर्यंत विविध आंदोलनाद्वारे मराठ्यांचा लढा चालूच राहील, असा इशारा देतानाच आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून येत्या सोमवारी हातकणंगले येथे रास्ता रोको करण्याचा निर्णय हातकणंगले तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

Must Read


हातकणंगले येथील मराठा समाज भवनमध्ये बुधवारी सकाळी समन्वय समितीची बैठक झाली. आरक्षणाबाबत सरकारने तातडीने हालचाली केल्या नाहीत तर पुढील काळात आमदार, खासदार, मंत्री यांच्या घरासमोर घंटानाद, धरणे आंदोलन, बेमुदत उपोषण करण्याचा निर्धारही बैठकीत करण्यात आला.

समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा.रवींद्र पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष दीपक कुन्नुरे, सचिव भाऊसाहेब फास्के, अॅड. संग्रामसिंह निंबाळकर, शिवाजीराव माने, अमित गर्जे, पंडित निंबाळकर, दयासागर मोरे, नारायण बिरंजे ,शिवाजी पाटील, महादेव चौगले आदींनी मनोगतात मराठा (Maratha)आरक्षणासाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. रास्ता रोको आंदोलनात तालुक्यातील समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. आदींसह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी रामदास टिकले यांनी आभार मानले