Main Featured

'स्पोर्ट्स ब्रा' घालून व्यायाम करणाऱ्या अभिनेत्रीला शिवीगाळ


कलाकारांना कायमच प्रेक्षकांचं प्रेम मिळतं, त्यांची वाहवा होते हे मान्य. पण, अनेकदा याच कलाकारांना समाजाचं एक वेगळं रुपही पाहायला (trolling)मिळतं. सध्या एका अभिनेत्रीनं अशाच प्रसंगाचा सामना केला. सोशल मीडियावर (Social media) तिनं याविषयीची माहिती दिली. काहीसा अनपेक्षित आणि तितकाच विचित्र असा हा प्रसंग तिलाही विचार पाडायला भाग पाडणारा ठरला. 


कन्नड अभिनेत्री संम्युक्ता हेगडे (Samyukhtha hegade) ही तिच्या काही मित्रमंडळींसोब बंगळुरूमधील एका पार्कमध्ये व्यायाम करत होते. यावेळी तिनं स्पोर्ट्स ब्रा (Sports bra)घातली होती. पण, असे कपडे घातल्यामुळेच तिला काँग्रेस नेत्या कविता रेड्डी आणि त्यांच्यासह काहींच्या रोषाचा सामना करावा (trolling)लागला. खुद्द अभिनेत्रीनं याबाबतची माहिती दिली. रेड्डी यांनी मात्र त्यांच्यावर लावण्यात आलेले हे आरोप फेटाळले असून, उलट अभिनेत्री आणि तिच्यासोबत असणाऱ्यांवरच आरोप केले आहेत.
Must Readसंम्युक्ता (Samyukhtha hegade) आणि तिच्यासोबत असणाऱी मंडळी मोठ्या आवाजत गाणी लावत होती आणि हे थांबवण्यास सांगताच त्यांनी सुरक्षा रक्षकाला शिवीगाळही केली असा आरोप रेड्डी यांनी अभिनेत्रीवर केला. संम्युक्तानंही सोशल मीडियाच्या आधार घेत तिच्यासोबत घडलेल्या या साऱ्या प्रकाराची माहिती दिली. 
आपण आज जसे वागत आहोत, त्यावरच देशाचं भवितव्य अवलंबून आहे. आम्हाला कविता रेड्डी यांच्याकडून आग्रा लेक परिसरात शिवीगाळ करण्यात आली. या घटनेला काही साक्षीदारही आहेत आणि पुरावा म्हणून काही व्हिडिओसुद्धा आहेत. या प्रकरणात कृपया लक्ष द्या... ', असं म्हणत झाला सर्व प्रकार चुकीचा असल्याचं म्हणत संम्युक्तानं संताप व्यक्त केला. सोबतच तिनं बंगळुरू पोलिसांकडे मदतही मागितली.