Main Featured

भारतासाठी आनंदाची बातमी!

Rafale fighter jets

चीनसोबत (China) वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक चांगली बातमी आहे. भारताला फ्रान्समधून पुढच्या महिन्यापर्यंत राफेल लढाऊ विमानांची (Rafale fighter jets) आणखी एक खेप मिळण्याची शक्यता आहे.


दुसर्‍या बॅचमध्येही 4 ते 5 राफेल भारताकडे पाठवले जाऊ शकतात. याआधी गुरुवारी अंबाला इथे आयोजित करण्यात आलेल्या समारंभात 5 राफेल लढाऊ विमानांना औपचारिकपणे भारतीय हवाई दलात दाखल करण्यात आलं. एकीकडे पूर्व लद्दाखमध्ये चीनबरोबरचा सीमा वाद तर दुसरीकडे भारताई हवाई क्षमता वाढणं ही एक सकारात्मक बाब आहे.

Must Readआतापर्यंत 5 विमानांचं वितरण
10 राफेल विमानं भारतात (Rafale fighter jets) पाठवण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचं दसॉल्ट एव्हिएशनला अधिकृतपणे सांगण्यात आलं आहे. याआधीही 5 लढाऊ विमानांचं वितरण करण्यात आलं तर 5 विमानं ही भारतीय वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी ठेवण्यात आली आहेत. राफेलच्या खास ट्रेनिंगसाठी भारताने आपल्या पायलट आणि क्रू मेंबर्सना फ्रान्स इथंही पाठवलं होतं. त्यात भारतीय वायुसेनेच्या वैमानिकांसह इंजिनिअर आणि तंत्रज्ञांचा समावेश होता. या सर्वांना वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये प्रशिक्षण देण्यात आलं आहे.
दरम्यान, चीनसोबत सुरू असलेल्या सीमा तणावादरम्यान पाच राफेल लढाऊ विमानांची (Rafale) पहिली खेप गुरुवारी बाला एयरबेसवर आयोजित कार्याक्रमात अधिकृतरित्या वायुसेनेत सामील करुन घेण्यात आली. अंबाला वायुसेना अड्ड्यावर आयोजित कार्यक्रमात पांच राफेल विमानांना भारतीय वायुसेनेत सामील करण्यात आलं.
वायुसेनेत राफेल विमानांना सामील करताना विमानंनी हवाई प्रदर्शन केलं आणि पारंपरिक ‘सर्व धर्म पूजा’ करण्यात आली. राफेल विमानोंना 17व्या स्क्वॉड्रनमध्ये सामील करण्यापूर्वी त्यांच्यावर पाणीच्या फवाऱ्याने पारंपरिक सलामी देण्यात आली. या rafale कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेंस पार्ली, चीफ ऑफ डिफेंस स्‍टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, वायुसेना प्रमुख आरकेएस भदौरिया आणि रक्षा सचिव अजय कुमार सामील झाले होते.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं की, राफेलला जगभरात सर्वात श्रेष्ठ मानले जाते. राफेलचा करार भारताच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या सीमेवर असलेली परिस्थिती पाहता राफेल विमानं सामील करणं अत्यंत गरजेचं होतं.
राफेल विमानांची निर्मिती फ्रान्समधील दसॉल्ट एविएशन या कंपनीने केली आहे. 29 जुलै रोजी पहिल्या खेपेअंतर्गत पाच राफेल विमानं भारतात आणण्यात आले होते. भारताने तब्बल चार वर्षांपूर्वी फ्रान्सकडून 59,000 कोटी रुपयांमध्ये 36 राफेल विमानं खरेदी करण्याचा करार केला होता.