Main Featured

Gold-Silver Rate Today सोने झालं स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने चांदीचा दर


 


सराफा बाजारात आज पुन्हा एकदा नफा वसुलीचा दबाव दिसून आला आहे. सोमवारी सकाळी कमॉडिटी बाजारात सोने (Gold) आणि चांदी (Silver)च्या दरात घसरण झाली आहे. सध्या सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५१४८१ रुपये असून त्यात २३४ रुपयांची घसरण झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ६७२९० रुपये(Know today's gold and silver prices) झाला आहे. त्यात ५८७ रुपयांची घसरण झाली आहे.


मागील तीन दिवसांत दुसऱ्यांदा सोने आणि चांदी स्वस्त झाले आहे. सराफ व्यवसायिकांना दिवाळीचे वेध लागले आहेत. लॉकडाउनमुळे गेले सहा महिने सराफा बाजाराची लय गेली होती. मात्र याच काळात सोन्याचे दर उच्चांकी स्तरावर गेले. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने आणि चांदीमध्ये सकाळपासून घसरण सुरु आहे. गेल्या महिन्यात कमॉडिटी बाजारात सोने ५६००० रुपयांवर गेले होते.

Advertise

Must Read

1) सांगली: जोरदार पावसामुळे सरनोबत मंदिर कोसळले


2) राज्यात COVID-19 रुग्ण बरे होण्याचा विक्रम, 26 हजारांपेक्षा जास्त जण घरी परतले


3) COVID-19: कोरोनावरची पहिली लस आरोग्य मंत्र्यांनीच घेतली; लोक म्हणाले, मानलं तुम्हाला!


4) कृषी विधेयकांवरून राज्यसभेत अभूतपूर्व गदारोळ


5) कांदा निर्यातबंदीचा पाच हजार कोटींना फटका?


जागतिक बाजारात स्पॉट गोल्डचा भाव ०.३ टक्के वधारून १९५४.६५ डॉलर प्रती औंस झाला. चांदीचा भाव प्रती औंस ०.६ टक्क्यांनी वधारून २६.९२ डॉलर झाला आहे. जागतिक पातळीवर करोना रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यातच डॉलरचे इतर चलनांच्या तुलनेत मूल्य कमी झाल्याने कमॉडिटी बाजारावर परिणाम झाल्याचे जाणकार सांगतात.नजिकच्या काळात सोने १९६६ ते १९७४ डॉलर प्रती औंस राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक बाजारातील घडामोडी (Know today's gold and silver prices) पाहता सोने दरात तेजी येईल, असे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे कमॉडिटी तज्ज्ञ हरीश व्ही. यांनी सांगितले. सोने १८८० डॉलर ते १९७५ डॉलरच्या आसपास राहील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

goodreturns या वेबसाईटच्या आकडेवारीनुसार सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०५०० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५१५०० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०३७० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५४८८० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०८५० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५३५५० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९६०० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५४०८० रुपये आहे.