Main Featured

Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ

Gold Rate Today

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये (Gold Rate Today) तेजी दिसून येत आहे. मागील सत्रात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्यानंतर सोमवारी सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. MCXवर गोल्ड फ्यूचर 0.4 टक्क्यांनी वाढून 51, हजार 532 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर सिल्वर फ्यूचर 0.6 टक्क्यांनी वाढून, 68 हजार 350 रुपये प्रति किलो झाली आहे. गेल्या महिन्यात विक्रमी उच्चांक असलेल्या सोन्याच्या किंमतीत प्रति दहा ग्रॅम 56 हजार 200 रुपयांची घट झाली आहे.


जागतिक बाजारपेठांमध्ये आज सोन्याचे दर वाढलेले दिसले. स्पॉट गोल्डमध्ये सोन्याचे प्रति औंस 1,941.11 डॉलर होते. त्याच वेळी, चांदीच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. चांदी 0.3 टक्क्यांनी घसरून 26.68 डॉलर प्रति औंस झाली. 15 ते 16 सप्टेंबर रोजी होणाऱ्या अमेरिकन मध्यवर्ती बँकेच्या दोन दिवसीय धोरण बैठकीवर आता सर्वांचे लक्ष (Gold Rate Today)आहे.

Must Read

अलिकडच्या काळात काही प्रमाणात घसरण झाली असली तरी आतापर्यंत सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. फ्चूचर मार्केटमध्ये सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 51,000 रुपये आहे. गेल्या महिन्यात प्रति 10 ग्रॅम 56,000 रुपयांच्या पातळीवर पोहोचले होते.
गेल्या महिन्यात सोने जवळपास 56,200 रुपये प्रति तोळा या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. अशाप्रकारे चांदी देखील जवळपास 10 हजार रुपयांनी कमी झाली आहे.कोरोना व्हायरस काळात सोन्याचांदीच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते अमेरिकन डॉलरमध्ये आलेल्या मजबुतीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती उतरल्या आहेत. मात्र सोन्याच्या मागणीत झालेली घसरण अद्यापही सुरूच आहे.