Main Featured

मास्क घालून दिवसाढवळ्या दरोड्याचा VIDEO VIRAL


face-mask-Of-robbery

face mask मास्क, सॅनिटायझर Sanitizer , बंदूक आणि दरोडा... कोरोना काळात कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी सरकारने सांगितलेल्या नियमांचं पालन करत दरोडेखोरांनी ज्वेलरी शॉप लुटलं आहे. हा दरोडा दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. ज्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

दरोड्याची Of robbery ही घटना आहे, उत्तर प्रदेशच्या अलिगडमधील. दरोडेखोर मास्क लावून दागिन्यांच्या दुकानात आले. त्यांनी हात सॅनिटाइझ केले आणि त्यानंतर एकाच्या डोक्याला थेट घोडा लावत त्यांनी ज्वेलरी शॉप लुटलं आहे. दागिने आणि पैसे लुटून हे दरोडेखोर पसार झाले आहेत.

व्हिडीओत आपण पाहू शकतो. ज्वेलरी शॉपमध्ये Jewelery shop कर्मचारी आणि काही ग्राहक आहेत. तिथं आणखी तीन तरुण येतात. ज्यांच्या चेहऱ्यावर मास्क आहे. तिघंही अगदी शांतपणे येतात. दुकानात येताच ते आपले हातही सॅनिटाइझ करतात आणि त्यानंतर तिथं बसलेल्या एका ग्राहकाच्या डोक्यावर थेट बंदूक लावतात.

तिथले दागिने आणि लॉकरमधील काही पैसे ते लुटतात. आपल्या बॅगेत सर्वकाही भरून तिथून निघून जातात. लाखोंचा ऐवज या दरोडेखोरांनी लुटला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.