Main Featured

कोल्हापुरात जम्बो कोविड सेंटर उभे करा


मुंबई(Mumbai), ठाणे आणि पुण्याच्या धर्तीवर कोल्हापुरातही (Kolhapur)जम्बो कोविड सेंटर लवकरात लवकर उभे करा, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी भेट घेऊन केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav Thackeray)यांना मागणीचे निवेदन पाठवले. खास बाब म्हणून  राज्य आपत्कालीन निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आवश्यक निधी देण्यात यावा, अशी आग्रही मागणी खा. संभाजीराजे यांनी यावेळी केल्याचे सांगितले. 


कोल्हापुरातील (Kolhapur) खासगी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलना महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत सामील करा, अशी मागणी केली. यावर राज्य शासन योग्य ती पावले उचलेल तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav Thackeray)यांची भेट घेऊन कोल्हापूर येथील परिस्थितीचे गांभीर्य  कळवू, असे मंत्री शिंदे म्हणाले. नगरविकास मंत्रालयाकडून पूर्तता करून कोल्हापुरात अत्याधुनिक जम्बो कोविड केंद्र उभारण्यासाठी सहकार्य करू. कोल्हापुरातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड केंद्र उभे करण्यासाठी प्रयत्न करू, असेही मंत्री शिंदे यांनी आश्वासन दिल्याचे खा. संभाजीराजे यांनी सांगितले.Must Read