Main Featured

अभियांत्रिकीचं शिक्षण पू्र्ण करून इतर क्षेत्रांमध्ये ठसा उमटवणाऱ्या 7 व्यक्ती

Happy engineers day


आज इंजिनिअर्स डे. हा दिवस भारतात मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. इंजिनिअरिंगमध्ये (Engineering)शिक्षण पूर्ण करूनसुद्धा इतर क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या सात वेगवेगळ्या व्यक्तींची आपण आज माहिती घेणार आहोत.



1. अरविंद केजरीवाल

इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस (IRS) मधले अधिकारी आणि IIT चे माजी विद्यार्थी असणाऱ्या केजरीवाल यांनी आपला राजकीय पाया 2011च्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनादरम्यान तयार केला होता.

2006 मध्ये त्यांना 'उदयोन्मुख नेतृत्त्व' म्हणून रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आणि पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर ओळखही मिळाली.

2. राजेश टोपे

मराष्ट्रात सध्या राजेश टोपे हे नाव सर्वांनाच परिचित आहे. कोरोना काळात आरोग्यमंत्री म्हणून ते पहिल्या फळीत कार्यरत आहेत.

इंजिनिअरिंगचं शिक्षण (Engineering) घेतलेल्या टोपे यांनी वयाच्या 23 व्या वर्षी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राजकारणात प्रवेश केला. त्यांनी 1996 साली लोकसभेची निवडणूकही लढवली होती. मात्र या पहिल्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

Must Read







3. सुधा मूर्ती

सुधा मूर्ती यांनीसुद्धा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं आहे. पण त्यांनी त्याच्याही पलिकडे जाऊन सुप्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिसच्या स्वरूपात महिला उद्योजक म्हणून ओळख प्राप्त केली आहे.

टेल्को कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंत्या होत्या. टाटा कंपनीसाठी त्यांनी पुणे, मुंबई आणि जमशेदपूरमध्ये काम केलं आहे.

4. रघुराम राजन

2013 मध्ये रघुराम राजन यांची निवड भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी करण्यात आली होती. तत्पूर्वी भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.

राजन यांनी 1985 ला दिल्लीतील IIT मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर IIM अहमदाबादमधून MBA ची पदवी घेतली. पुढे त्यांनी मॅसेच्युसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्येही शिक्षण घेतलं आहे.

5. अनिल कुंबळे

भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांना जगातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक मानलं जातं. त्यांनी भारताचे क्रिकेट प्रशिक्षक म्हणूनसुद्धा काम केलं आहे.

मूळचे कर्नाटकचे असलेल्या अनिल कुंबळे यांनीही इंजिनिअरिंगची पदवी मिळवलेली आहे. बंगळुरूच्या राष्ट्रीय विद्यालय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

6. अरविंद गुप्ता

अरविंद गुप्तांनी आयआयटी कानपूरमधून शिक्षण पूर्ण केलं. लहान मुलांना विज्ञान समजावं म्हणून त्यांनी खेळणी तयार करण्यास सुरुवात केली. त्यांचा हा प्रयोग देशभरात प्रसिद्ध झाला. गेल्या तीस वर्षांपासून ते मुलांना खेळातून विज्ञान शिकवत आहेत. त्यांनी स्वयंसेवकांची एक फौजच उभी केली आहे.

याशिवाय अरविंद गुप्ता हे अनुवादक म्हणूनही सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी आतापर्यंत 150 पुस्तकांचा हिंदीत अनुवाद केला आहे.

7. सोनू सुद

सोनू सूद मुळचा पंजाबचा असून गेल्या काही वर्षांपासून तो मुंबईत राहतोय. सोनूने नागपूरच्या इंजिनिअरींग महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनतर सोनूने मॉडेलिंग आणि सिनेमात काम करण्यासाठी मुंबई गाठली.

सोनू सूदने हिंदी, इंग्रजी, तेलगू, तामिळ, कन्नड, पंजाबी आणि चीनी सिनोमात काम केलं आहे. 1999 साली 'कल्लाझागर' या तामिळ सिनेमापासून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.