Main Featured

'तीन महिलांची चौकशी करून ड्रग्जचा प्रश्न सुटणार नाही'

Drugs caseDrugs case- 'देशातच नव्हे तर जगातच ड्रग्ज हा प्रश्न मोठा गंभीर आहे. तीन महिलांना बोलावून त्यांच्याकडे ड्रग्जची चौकशी करून प्रश्न सुटणार नाही. त्या समस्येचा समूळ नायनाट केला पाहिजे. त्याकरिता शालेय जीवनापासूनच या विषयाची जनजागृती केली पाहिजे. 

ड्रग्जमुक्त (Drugs case)भारत करण्यासाठी आता केंद्र सरकारनेच मोहीम सुरू करावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांसंदर्भात जिल्हा परिषदेत आयोजित बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

Must Read

1) रेशन कार्डला करा आधार लिंक, अन्यथा मोफत धान्य बंद
2) SBI-ICICI सह आज रात्रीपासून बंद होणार ही महत्त्वाची सेवा

3) रिया चक्रवर्तीने जाणिवपूर्वक केलं हे काम, एनसीबीचा मोठा खुलासा

4) दोन्ही राजांनी आरक्षणाचा प्रश्न भाजपकडून सोडवावा
5) टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो

'सध्या महाराष्ट्रासह (maharashtra)देशात करोना(corona), बेराजगारी आणि देशाची अर्थव्यवस्था या मोठ्या समस्यांपेक्षा कोणताही प्रश्न मोठा नाही. त्यामुळे त्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे', असे त्यांनी नमूद केले. माझ्यासह शरद पवार(sharad pawar), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(uddhav thackeray), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना चौघांना प्राप्तिकर विभागाची नोटीस आली आहे. केंद्र सरकारने त्यांचे काम केले आहे. प्राप्तिकराबाबत त्यांनी प्रश्न विचारले असून त्यावर आम्ही उत्तरे देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.


'मराठा आरक्षणास सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली असली आहे. त्याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून सुप्रीम कोर्टाला महाराष्ट्रावर अन्याय करू नये, अशी विनंती करावी,' अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे, याचाही त्यांनी पुनरुच्चारही केला.