Main Featured

कुत्र्यानं सोडवलं दोन मेंढ्यामधलं भांडण, पाहा VIDEO


dog-comes-between-2-sheeps-fight

काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक प्राण्यांचे व्हिडीओ video व्हायरल होत आहेत. वाघांमधील लढाई, मांजर आणि सरड्यातील लढाईचा एक व्हिडीओही समोर आला होता. आता दोन मेंढ्यांमधील भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये सर्वात चर्चाचा विषय ठरला तो म्हणजे कुत्रा. या कुत्र्यानं दोन मेंढ्यांचं भांडण सोडवल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता दोन मेंढ्या भांडत आहेत. हे भांडण पाहून कुत्रा तिथे येतो आणि त्यांचं भांडण सोडवतो. या कुत्र्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

शेतकऱ्याचा किंवा पशुपालन, कुकुटपालन जे करतात त्यांच्याकडे हमखास कुत्रे पाळलेले पाहायला मिळतात. बऱ्याचदा या कुत्र्यांना घाबरून हे प्राणी राहतात असाही एक समज आहे तर काही ठिकाणी या प्राण्यांवर कुत्रे लक्ष ठेवतात असंही म्हटलं जातं. त्यामुळे बऱ्याचदा अशा ठिकाणी कुत्रा असतो.

या कुत्र्यानं दोन मेंढ्यांमधील भांडण सोडवल्यामुळे चर्चेचा विषय झाला आहे. IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 11 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.