Main Featured

आयजीएममध्ये पालकमंत्र्यांसमोरच वादावादी

IGM Hospital ICU Area


पालकमंत्री सतेज पाटील यांनी आढावा बैठकीअगोदर आयजीएम हॉस्पिटल (IGM Hospital)येथे भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेला अतिदक्षता विभागातील (ICU)केवळ 7 बेड सुरु असल्याचे आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले.


तसेच त्या 42 कर्मचार्‍यांचाही विषय काढला. यावेळी नगरसेवक मदन कारंडे, रवि माने, शशांक बावचकर, महादेव गौड यांनी आक्षेप घेतला. तर जिल्हा शल्यचिकित्सकांनी अतिदक्षता विभागातील (ICU)सोयी दाखवतो चला असे आमदार आवाडेंना सांगितले.

यावेळी आमदार व नगरसेवकांमध्ये काही काळ वादावादी झाली. अखेर पालकमंत्र्यांनी मध्यस्ती करत वादावर पडदा टाकला.

Must Read