upsc exam


upsc exam 2020- येत्या 4 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या यूपीएससीच्या प्रिलिम परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. कोरोना (corona)संकट तसेच देशाच्या विविध भागात आलेला महापूर यामुळे प्रिलिम परीक्षा पुढे ढकलली जावी, अशी विनंती अनेक याचिकांद्वारे न्यायालयाला करण्यात आली होती. 


केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससीच्या प्रिलिम परीक्षा पुढे का ढकलल्या जाऊ शकत नाहीत, यावर सविस्तर उत्तर सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने गत सुनावणीवेळी दिले होते. त्यानुसार केंद्र सरकारने  (central government )एका प्रतिज्ञापत्राद्वारे आपले उत्तर सादर केले होते. 

Must Read

1) रेशन कार्डला करा आधार लिंक, अन्यथा मोफत धान्य बंद
2) SBI-ICICI सह आज रात्रीपासून बंद होणार ही महत्त्वाची सेवा

3) रिया चक्रवर्तीने जाणिवपूर्वक केलं हे काम, एनसीबीचा मोठा खुलासा

4) दोन्ही राजांनी आरक्षणाचा प्रश्न भाजपकडून सोडवावा
5) टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो

यानंतर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर, न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने प्रिलिम परीक्षा ठरल्या वेळेत होईल, असे स्पष्ट केले. 

प्रिलिम परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचा युक्तिवाद युपीएससीचे (upsc exam 2020 )वकील नरेश कौशिक यांनी न्यायालयात केला होता. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता आवश्यक त्या आरोग्यविषयक दक्षता घेत परीक्षा घेतली जाणार आहे. 

केंद्र सरकारच्या विविध खात्यामधील ग्रुप ए आणि ग्रुप बी च्या जागा तसेच आयएएस आणि आयपीएसची पदे यूपीएससी परीक्षेद्वारे भरली जातात. दरवर्षी या परीक्षा प्रिलिम परीक्षा मे महिन्यात होते, पण कोरोना संसर्गामुळे ही परीक्षा आधी सप्टेंबर महिन्यापर्यंत आणि नंतर ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबविण्यात आली होती.