Main Featured

इचलकरंजीत रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन उपलब्ध करा, अन्यथा....


Ichalkaranji- शहर आणि परिसरात कोरोनाबाधितांची (coronavirus)संख्या झपाट्याने वाढत आहे. शासनाने रेमडेसिव्हिर हे इंजेक्‍शन मोफत उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, कोरोना हॉटस्पॉट असलेल्या इचलकरंजीत हे इंजेक्‍शन उपलब्ध नाही. हे इंजेक्‍शन इचलकरंजीत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आज भाजपने केली. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळाने प्रांत कार्यालयात शिरस्तेदार उदयसिंग गायकवाड यांना दिले. दोन दिवसांत इंजेक्‍शन उपलब्ध न झाल्यास सर्वसामान्यांसाठी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षांसह उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. 


खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना बाधितांना रेमडेसिव्हिर हे इंजेक्‍शन (remdesivir injection) महत्त्वाचे असल्याने ते जिल्हा परिषद येथे मोफत मिळत होते. परंतु, 3 सप्टेंबरपासून हे इंजेक्‍शन देणे बंद केले आहे. आता हे इंजेक्‍शन खासगी दवाखाना, औषधालयात उपलब्ध करून दिल्याचे फलक लावले आहेत. परंतु, इचलकरंजीसह जिल्ह्यात एकाही औषधालयात किंवा खासगी रुग्णालयात हे इंजेक्‍शन उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना व पर्यायाने त्यांच्या नातेवाईकांनाही मनस्ताप होत आहे. Must Read


कोरोनावर (coronavirus) अत्यंत गुणकारी असलेले हे इंजेक्‍शन जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे मिळत होते. त्यासाठी इचलकरंजीतील नागरिकांना हेलपाटे मारावे लागत होते. कोरोनाचा जिल्ह्यातील सर्वांत हॉटस्पॉट असलेल्या इचलकरंजीत हे इंजेक्‍शन मिळत नसल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हे इंजेक्‍शन इचलकरंजीत त्वरित उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी भाजपतर्फे आज करण्यात आली.

या संदर्भात प्रांत कार्यालयात निवेदन दिले असून, दोन दिवसांत इंजेक्‍शन उपलब्ध न झाल्यास सर्वसामान्यांसाठी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षांसह उपोषण छेडण्याचा इशारा शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांनी दिला. शिष्टमंडळात नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, शहाजी भोसले, अरुण कुंभार, दीपक पाटील, नगरसेवक मनोज हिंगमिरे, मनोज साळुंखे, महिला अध्यक्षा पूनम जाधव, योगिता दाभोळे, निर्मला मोरे, अण्णा आवळे, प्रमोद बचाटे, म्हाळसाकांत कवडे, विजय कोळेकर, प्रदीप माळगे, उत्तम कुंभार यांचा समावेश होता.