Main Featured

ठाकरे सरकार म्हणजे "गुंडाराज", कंगनाची टिव-टिव सुरूच

cm uddhva thackerayindia politics- मुंबई पोलिस (police)आणि मुंबईवर केलेल्या वक्तव्यानंतर अभिनेत्री कंगना राणावतनं (kangana ranaut)पुन्हा एकदा मुंबई आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhva thackeray)यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईत गुंडाराज सुरू असल्याचा आरोप तिनं केला आहे.


मुंबई पोलिस (police)आणि मुंबईवर टीका केल्यानंतर अभिनेत्री कंगना राणवतला मुंबईत भीती वाटत असेल तर स्वतःच्या राज्यात जा, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला होता. तेव्हापासून कंगना आणि शिवसेनेत सामना रंगला आहे. कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेनं कारवाई केल्यानंतर हा वाद आणखीनच चिघळला. आपल्या बंगल्यावरील कारवाई बेकायदेशीर असल्याचं सांगत कंगनानं कोर्टात धाव घेतली आहे. त्यानंतर सातत्याने कंगना महाराष्ट्र सरकारवर टीका करत आहे.

Must Read

1) शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

2) आता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार ...

3) 'पुढच्या 5 मिनिटात आमदार निवास बॉम्बने उडवून टाकू

4) UC Browser ला मिळाला स्वदेशी पर्याय लाखो युझर्सनं केलं डाउनलोड

5) ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो


'महाराष्ट्र सरकारवर टीका करणाऱ्या युट्यूबर साहिल चौधरीला अटक केल्यानंतर कंगनानं ठाकरे सरकारवर आरोपाच्या फैरी झाडल्या आहेत. मुंबईत गुंडाराज सुरू आहे का? जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या टीमला कोणी प्रश्न विचारू शकत नाही का? ते आमच्यासोबत काय करू शकतील? आमचं घर तोडतील का आम्हाला मारतील? याचं उत्तर कोण देणार?' असा सवाल कंगनानं काँग्रेसला केला आहे.


'महाराष्ट्र सरकारच्या कामावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या साहिलविरोधात कोणीतरी तक्रार दाखल करतं आणि त्याला लगेच अटक होते पण अनुराग कश्यपविरोधात पायल घोषनं दाखल केलेल्या तक्रारीला बरेच दिवस झाल्यानंतरही अनुराग कश्यप मोकाट फिरतोय. काय आहे हे सगळं? असा सवाल कंगनानं उपस्थित केलाय.