Main Featured

सांगलीत अट्टल गुन्हेगारावर खुनी हल्ला

Sangli

Sangli- शहरातील वाल्मिकी आवास योजना परिसरात वर्चस्ववाद, चोरीतील सोन्याच्या वाटणीवरून एका अट्टल गुन्हेगारावर खुनी हल्ला करण्यात आला. गुरुवारी रात्री उशीरा ही घटना घडली. राकेश पंडित पुजारी असे जखमीचे नाव आहे.


याप्रकरणी सांगली (Sangli)शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. राकेश पुजारी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर चोरी, जबरी चोरी, लुटमार असे अनेक गुन्हे दाखल आहेत. गेल्या काही दिवसांपासून तो सक्रीय झाला होता. सलगरे येथील चोरी प्रकरणी त्याला अटकही करण्यात आली होती. वाल्मिकी आवास योजना परिसरात त्याने त्याचा वेगळा गट निर्माण करण्यास सुरुवात केली होती.त्यातूनच गुरुवारी रात्री पाचजणांनी त्याला जाब विचारत, तसेच चोरीच्या सोन्यातील वाटणीच्या कारणावरून त्याच्यावर खुनीहल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगण्यात आले.